Manasvi Choudhary
सोशल मीडियावर नवनवीन ट्रेंड व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हिडीओ हे खरे असतात तर काही मजेशीर असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल
दुकान उघडतानाचा हा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये एक दुकानदार दुकान उघडताना दिसत आहे.
दुकान उघडण्यापूर्वी या दुकानदाराने शटरवर चावी वाजवली आहे. सध्या त्याच्या या कृत्याचं कारण नेटकरी विचारत आहे.
या दुकानदाराने शटरवर चावी का वाजवली असेल असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे यामागचं कारण आपण या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
या व्हिडीओला सोशल मीडियावर नेटकऱ्यांची पंसती मिळाली आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकर्यांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
एका युजरने म्हटलं आहे की, दुकान बंद असल्याने आणि अंधार असल्यामुळे शटरच्या खाचांमध्ये, पट्ट्यांमध्ये किंवा कुलूपामध्ये एखादी पाल, सरडा, झुरळ किंवा इतर लहान कीटक असू शकतात.
जेव्हा दुकान उघडले जाते तेव्हा चावीने शटरवर आवाज केल्यास, त्या आवाजामुळे ते छोटे किटक पळून जातात. तसेच यामुळे ते शटरखाली दबले जाण्यापासून किंवा दुकानात आत जाण्यापासून वाचतात.
अनेकजण दुकान बंद केल्यानंतर असं करतात. तर आणखी एकाने म्हटलं आहे की, असे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या