Mumbai Boat Accident  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Boat Accident : गरोदर पत्नी, ४ वर्षांचं लेकरू पोरकं झालं; नेव्हीत इंजिनीअर असलेल्या बदलापूरच्या तरुणाचा बोट दुर्घटनेत मृत्यू

Mumbai Boat Accident update : बदलापूरमधील तरुण इंजिनीअरचा बोट दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. नेव्हीमधील इंजिनीअर असलेल्या बदलापुरातील तरुणाचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Vishal Gangurde

मंगेश कडव, साम टीव्ही

बदलापूर : मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाजवळ बोटीचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सात पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. या अपघातात नेव्हीच्या अधिकाऱ्यांसह एकूण तीन कर्मचाऱ्याचांही मृत्यू झाला आहे. यात नेव्हीमधील इंजिनीअर असलेल्या मॅकेनिकल इंजिनीअरचा देखील मृत्यू झाला आहे. तरुण नेव्हीमधील मॅकेलिकल इंजिनीअरच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटाला जाणाऱ्या बोट दुर्घटनेत बदलापुरातील तरुण इंजिनीअर मंगेश केळशीकर यांचा मृत्यू झाला. ते नेव्हीत मेकॅनिकल इंजिनियर म्हणून कार्यरत होते. स्पीड बोटच्या इंजिनची टेस्टिंग सुरू असताना अपघात झाला. घरातला कमावता व्यक्ती गेल्याने केळशीकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी आणि चार वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. मंगेश यांची पत्नी तीन महिन्यांची गर्भवती आहे.

मंगेश त्यांच्या कुटुंबात हेच एकमेव कमावते होते. त्यांच्या जाण्यानं केळशीकर कुटुंबाचा आधार हरपला आहे. शासनाने तसेच सामाजिक संस्थांनी केळशीकर कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात द्यावा, असं आवाहन स्थानिक रहिवाशांनी केलं आहे. मंगेश केळशीकर यांच्या निधनाने ते राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे. मंगेश केळशीकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शेजाऱ्यांनी भावुक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

'खूप मनमिळाऊ स्वभवाचा मुलगा होता. सर्व कार्यक्रमात सहभागी व्हायचा. त्याचं वय देखील जास्त नव्हतं. ३० ते ३३ दरम्यान त्याचं वय असेल. त्याचं 4 वर्षांचं बाळ आहे. त्याची पत्नी तीन महिन्याची गरोदर आहे. मंगेशचा मृत्यू फार दु:खद आहे. त्या मुलीच्या मागे कोणीच नाही. तिला सासरे नाहीत. तिला वडील नाहीत. ती एकटी पडली आहे. तिला आता मदतीची नितांत गरज आहे', असे मंगेश यांच्या शेजारी कविता यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

SCROLL FOR NEXT