Mumbai Sea Boat Accident Update : बोट अपघातात १३ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ३ जणांचा समावेश

Mumbai Boat Accident News : नौदलाच्या बोटीने प्रवासी बोटीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये नाशिकमधील एकाच कुटुंबातील तीन जणांचा समावेश आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Mumbai Boat Accident
Mumbai Boat AccidentGoogle
Published On

Mumbai sea Boat accident update : गेट वे ऑफ इँडिया येथून एलिफंटाला निघालेल्या नीलकमल या प्रवासी फेरी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने जोरदार धडकली. बुधवारी झालेल्या या भीषण अपघातत १३ जणांचा मृत्यू झालाय. १०१ जणांना वाचवण्यात यश आले. जेएनपीटी रुग्णालयात रूग्णांवर उपचार झाले. काही जणांची प्रकृती स्थिर असल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. तर काही जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत. मृताच्या वारसांना ५ लाख रूपयांची मदत सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.

बोट अपघातातील १३ मृतांपैकी दहा जणांची ओळख पटली आहे. या दुर्घटनेत दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मृतांमध्ये सात पुरुषांसह चार महिलांनी प्राण गमावले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. आतापर्यंत 101 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान, दुर्घटनेला नेव्हीचे कर्मचारी जबाबदार असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. त्याशिवाय नीलकमल बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते, असा दावाही प्रत्यक्षदर्शीने केला.

Mumbai Boat Accident
Mumbai Boat Accident: नौदलाची स्पीड बोट प्रवासी बोटला कशी धडकली? नेव्हीनं दिलं स्पष्टीकरण

मुंबई येथील गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाकडे जाताना बोट उलटल्याची दुर्घटना घडली. उरण मधील जेएनपीटी रुग्णालयात एकूण 58 अपघातग्रस्त प्रवाशांना दाखल करण्यात आले होते. यामधील 57 प्रवाशांची प्रकृती स्थिर असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये दोन जर्मन येथील परदेशी प्रवाशांचा देखील समावेश होता. तर यामध्ये एका सात वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. निधेश राकेश अहिरे असं या मयत मुलाचं नाव असून त्याच्या आई-वडिलांचा देखील या दुर्घटनेत मृत्यू झालाय. राकेश नानाजी अहिरे व हर्षदा राकेश अहिरे अशी आई-वडिलांची नावं असून ते नाशिक जिल्ह्यातील बसवंत, पिंपळगाव येथील रहिवासी होते. तर मुंबई येथे अहिरे कुटुंबीय पर्यटनासाठी आले होते.

Mumbai Boat Accident
Mumbai JNPT Boat Accident : भर समुद्रात बोटीचा अपघात कसा घडला? ८० प्रवासी आणि रेस्क्यू ऑपरेशनचा थरार

नीलकमल बोट दुर्घटनेला नेव्ही कर्मचाऱ्यांची स्टंटबाजी जबाबदार असल्याची टीका करण्यात येत आहे. इंजिनाच्या चाचणी दरम्यान बोटीवरील ताबा सुटल्याने दुर्घटना झाल्याचा नेव्हीकडून दावा करण्यात आलाय. मात्र नेव्हीचे कर्मचारी स्टंटबाजी करत असल्याचा प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितले. आधी चार ते पाच वेळा घिरट्या मारल्यानंतर आमच्या पुढ्यातून बोट वळवताना अपघात झाला. दुर्घटनेला नेव्हीचे कर्मचारी जबाबदार आहेत, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

Mumbai Boat Accident
Mumbai Boat Accident : मुंबईतील समुद्रात बोटीचा भीषण अपघात, १३ प्रवाशांचा मृत्यू; CM देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

नीलकमल बोटीला झालेल्या दुर्घटनेला दुसरं तिसरं कोणी जबाबदार नसून नेव्हीचे कर्मचारी जबाबदार असल्याचा खळबळजनक दावा प्रत्यक्षदर्शीने केला आहे. नेव्हीचे अधिकारी स्टंटबाजी करत होते आणि त्यामुळेच ही दुर्घटना झाल्याचे म्हणत नेव्हीचा इंजिनाची चाचणी सुरू असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शी श्रवण कुमार यांनी खोडून काढला आहे. ज्या मोबाईल व्हिडिओमध्ये अपघाताची लाईव्ह दृश्य चित्रित झाली आहेत तो व्हिडिओ देखील श्रवण कुमार यांनीच काढला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com