Mumbai Boat Accident: नौदलाची स्पीड बोट प्रवासी बोटला कशी धडकली? नेव्हीनं दिलं स्पष्टीकरण

Mumbai Boat Accident: मुंबईतील समुद्रात दोन बोटींचा अपघात झाला. नेव्हीच्या बोटीने एका प्रवासी बोटीला धडक दिल्याने हा अपघात झाला. परंतु हा अपघात नेमका कसा झाला याचं स्पष्टीकरण नौदलाकडून देण्यात आले आहे.
Mumbai Boat Accident
Mumbai Boat AccidentGoogle
Published On

मुंबईच्या समुद्रात दोन बोट धडक झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. एलिफंटाकडे जाणारी बोट दिसत असतानाही स्पीड बोट थेट सरळ येत या बोटला धडकली. यामुळे हा अपघात नेमका कशामुळे झाला हा उपस्थित होत आहे. याचदरम्यान घटनेनंतर भारतीय नौदलाने एक निवेदन जारी केलंय.

आज दुपारीच्या दरम्यान मुंबई गेटवे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे एक प्रवाशी बोट जात होती. आत समुद्रात आल्यानंतर एक स्पीड बोट इकडून तिकडे घिरट्या घालत होती. त्यानंतर ही स्पीड बोट प्रवासी बोटीकडे आली आणि पुढच्या भागाला धडकली. यात १३ जणांचा मृत्यू झाला. धडक देणारी बोट नौदलाची असल्याचं सांगितलं जात आहे. आतात नौदलाकडून एक पत्रक जाहीर करण्यात आलं असून त्यात अपघाताचं कारण सांगण्यात आलंय.

Mumbai Boat Accident
Mumbai Boat Accident : मुंबईतील समुद्रात बोटीचा भीषण अपघात, १३ प्रवाशांचा मृत्यू; CM देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

गेटवे ऑफ इंडिया परिसरातून आज 18 डिसेंबर रोजी दुपारी नीलकमल नावाची फेरीबोट एलिफंटाकडे जात होती. त्यावेळी एक नौदलाची स्पीड त्याला धडकली. यानंतर प्रवासी बोटचा पुढील भाग तुटला असून बोटमधील ८० पाण्यात बुडाले. या घटनेनंतर ५६ जणांना जेएनपीटी रुग्णालयात, ९ जणांना नेव्ही डॉकयार्ड रुग्णालयात, ९ जणांना सेंट जॉर्ज रुग्णालयात आणि एका व्यक्तीला अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकूण ९९ जणांची सुटका करण्यात आलीय.

Mumbai Boat Accident
Mumbai Boat Capsized Video: प्रवासी बोटीला स्पीड बोटची जोरदार धडक; अपघाताचा थरारक व्हिडिओ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघातावर शोक व्यक्त केलाय. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केलीय. देवेंद्र फडणवीस यांनी X वर एक पोस्ट शेअर केलीय. यात ते म्हणाले, "एलिफंटा येथे जाणाऱ्या नीलकमल बोटीच्या अपघाताचे वृत्त आम्हाला समजले. नौदल, तटरक्षक दल, बंदर, पोलिसांच्या बोटी तातडीने मदतीसाठी पाठवण्यात आल्या आहेत."

आम्ही जिल्हा आणि पोलीस प्रशासनाच्या सतत संपर्कात आहोत, सुदैवाने बहुतांश नागरिक बचावले आहेत. मात्र, अजूनही बचावकार्य सुरूच आहे. "जिल्हा प्रशासनाला त्या सर्व यंत्रणा बचाव कार्यासाठी तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत."

काय आहे अपघाताचं कारण?

दोन बोटींचा अपघात कसा झाला? याचं स्पष्टीकरण नौदलाकडून देण्यात आले आहे. नौदलाकडून एक्स वर पोस्ट करत अपघाताचं कारण सांगण्यात आलंय. भारतीय नौदलाच्या एका बोटीच्या इंजिन चाचणीदरम्यान मुंबई बंदरात आज दुपारी इंजिनमध्ये बिघाड झाल्याने नियंत्रण सुटले. त्यामुळे एका प्रवासी फेरीला बोट धडकली.

यामध्ये आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळावरून बचावलेल्या लोकांना जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आलंय. समुद्रात बुडालेल्यांच्या शोधासाठी ४ नौदल हेलिकॉप्टर, ११ नौदल विमाने, एक तटरक्षक नौका आणि तीन सागरी पोलीस क्राफ्टसह बचावकार्याला लागले. होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com