Mira Bhayander Marathi Morcha Saam Tv
मुंबई/पुणे

Mira Bhayander Marathi Morcha : मीरारोड स्टेशनबाहेर मोर्चा, आंदोलनस्थळी चिमुकल्याची शिवगर्जना; पाहा Video

Marathi Morcha At Mira Road Station : अमराठी व्यावसायिकांनी काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मनसेकडून मीरारोडमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या आंदोलनातला लहान मुलाचा शिवगर्जना देतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Yash Shirke

Mira Bhayander Morcha : मीरा भाईंदरमध्ये अमराठी व्यावसायिकांनी मोर्चा काढून शक्तीप्रदर्शन केले. याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी सुरुवातीला मोर्चाला परवानगी नाकारली. मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या. मोर्च्यादरम्यान अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

मराठी अस्मितेच्या मोर्चा सुरु झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करण्यास सुरुवात केली. या मोर्चासाठी एक छोटा चिमुरडा छत्रपती शिवाजी महाराज बनून घोड्यावर बसून सामील झाला होता. धरपकड सुरु झाल्यानंतर त्यालाही घोड्यावरुन खाली उतरवण्यात आले होते. त्यानंतर आंदोलकांना बालाजी हॉटेल चौक ते मीरारोड रेल्वे स्थानकापर्यंत मोर्चा काढण्याची परवानगी देण्यात आली.

मनसे आणि ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी आंदोलनस्थळी पोहोचल्यानंतर मीरारोड स्टेशनबाहेर घोषणाबाजी झाली. यादरम्यान घोड्यावर बसून मोर्चात सहभागी झालेल्या मुलाला नेते, पदाधिकाऱ्यांसोबत उभे करण्यात आले. लहान मुलाने जमलेल्या सर्व आंदोलनकर्त्यांसमोर शिवगर्जना/ गारद दिली. आंदोलनस्थळी चिमुकल्याच्या शिवगर्जनेनंतर मोठा जल्लोष पाहायला मिळाला.

मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांना पोलिसांनी मंगळवारी (८ जुलै) पहाडे साडेतीन वाजता ताब्यात घेतले होते. सुरुवातीला काशिमीरा आणि नंतर पालघर पोलीस ठाण्यात त्यांना नेण्यात आले होते. दुपारी बारा-साडेबाराच्या सुमारास त्यांना सोडण्यात आले. त्यानंतर अविनाश जाधव आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले. तेथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar Setback : शरद पवारांना पश्चिम महाराष्ट्रात धक्का, आमदाराचा मुलगा भाजपात जाणार

Success Story: बाईपण भारी देवा! गृहिणी ते डीएसपी; संसारचा गाडा ओढत स्पर्धा परीक्षेत यश; अंजू यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Maharashtra Live News Update : उद्धव ठाकरे आज पुणे दौऱ्यावर

Jio And Airtel: ₹५०० पेक्षा कमीत रिचार्ज प्लॅन; Jio की Airtel, कोण देतेय जास्त फायदा? वाचा सविस्तर

Shukraditya Rajyog: 9 ऑक्टोबरपासून 'या' राशींचं नशीब फळफळणार; शुक्रादित्य राजयोगामुळे मिळणार पैसा

SCROLL FOR NEXT