

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 वर्ल्ड कपचा उपांत्य फेरीचा सामना
मुंबईतील वानखेडे येथे होतोय मोठा रोमांचकारी सामना
टी-20 सामन्यांच्या एकूण आकडेवारीत भारताने १७ तर इंग्लंडने १२ सामने जिंकले आहेत.
टी-२० वर्ल्ड कपमधील दुसरा उपांत्य सामना आज भारत आणि इंग्लंड यांच्यात होत आहे. या सामन्यातील विजेता संघ ८ मार्च रोजी अहमदाबादमध्ये न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे. उपांत्य फेरीतील दुसरा सामना मुंबईच्या वानखेडे येथे होणार आहे. भारत आणि इंग्लंड सलग तिसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत आमनेसामने आले आहेत. २०२२ मध्ये भारताचा पराभव झाला होता, तर २०२४ मध्ये भारताने इंग्लंडचा पराभव केला होता.
इंग्लंडने टी-२० वर्ल्डकपमध्ये यापूर्वी पाच वेळा भारताचा सामना केला आहे. यात उपांत्य फेरीचाही समावेश आहे. २०२४ मध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला होता. त्यामुळे भारताने हेड-टू-हेड ३-२ अशी आघाडी घेतली आहे, दरम्यान या स्पर्धेत अद्याप कोणत्याही संघाला सलग दोन सामने जिंकता आले नाहीत. एकूण टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचा रेकॉर्ड चांगला आहे. २९ सामन्यांपैकी इंग्लंडने १२ आणि भारताने १७ सामन्यांमध्ये विजय मिळवलाय.
वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. संध्याकाळच्या सामन्यात ड्यु फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे गोलंदाजांना चेंडू पकडणे कठीण जाते आणि फलंदाजांना खेळणे सोपे होते. म्हणूनच अनेक संघ टॉस जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतात.
टीम इंडिया त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणतेही बदल करण्याच्या मनःस्थितीत दिसत नाही. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात इंग्लंडने रेहान अहमदला अतिरिक्त फिरकी गोलंदाज म्हणून समाविष्ट केले आणि त्याने उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.