Chhatrapati Shivaji Maharaj’s Fort Architecture: रायगडाचा महादरवाजा शत्रूंचे हत्ती कधीच का तोडू शकले नाहीत?

Surabhi Jayashree Jagdish

रायगड किल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रायगड किल्ला हा स्वराज्याची राजधानी आणि अत्यंत सुरक्षित दुर्ग मानला जात होता. या किल्ल्याच्या संरक्षणासाठी केलेली बांधणी अत्यंत हुशारीने आणि युद्धतंत्र लक्षात घेऊन करण्यात आली होती.

raigad fort maharashtra

किल्ल्याचा महादरवाजा

या किल्ल्याच्या महादरवाज्याची रचना अशी केली होती की शत्रूने हत्तींच्या मदतीने हल्ला केला तरी तो सहज तोडता येणार नाही. त्यामुळे इतिहासात अनेक वेळा प्रयत्न झाले तरी महादरवाजा हत्तींच्या धडकेने कधीही कोसळला नाही.

raigad fort mahabharwaja design

वळणदार रस्ता

रायगडाच्या महादरवाजाकडे जाणारा रस्ता सरळ नसून वळणदार म्हणजेच गोमुखासारखा आहे. हत्तीला धावत येऊन जोरात धडक देण्यासाठी सरळ मार्ग आवश्यक असतो. मात्र या वळणदार रस्त्यामुळे हत्तीला वेग घेता येत नव्हता.

shivaji maharaj forts

दरवाज्याची मजबूत बांधणी

महादरवाजा अत्यंत जाड लाकूड आणि इतर मजबूत गोष्टीना तयार करण्यात आला होता. दरवाज्यावर लोखंडी खिळे आणि मजबूत चौकट बसवली होती. यामुळे हत्तीने धडक दिली तरी दरवाजा सहज तुटत नसे.

raigad fort defense system

उंच आणि अरुंद प्रवेशमार्ग

महादरवाजाकडे जाणारा मार्ग उंच आणि अरुंद ठेवला होता. मोठे हत्ती किंवा सैन्य एकदम मोठ्या संख्येने तिथे पोहोचू शकत नव्हते. यामुळे शत्रूची ताकद कमी होत असे.

shivaji maharaj war strategy

वरून हल्ला करण्याची सोय

महादरवाज्याच्या वरती बुरुज आणि मचाण बांधलेले होते. तिथून सैनिक शत्रूंवर दगड, गरम तेल किंवा बाण सोडू शकत होते. हत्ती जवळ आला की वरून हल्ला करून त्याला परतवले जाई.

raigad fort western ghats

किल्ल्याची उंची आणि नैसर्गिक संरक्षण

रायगड किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे २७०० फूट उंच आहे. किल्ल्याभोवती खोल दऱ्या आणि कडेकपारी आहेत. या नैसर्गिक रचनेमुळे मोठ्या सैन्याला हल्ला करणे कठीण होत असे.

raigad fort travel guide

मराठ्यांची युद्धनीती

छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यांची रचना पूर्णपणे युद्धतंत्रानुसार केली होती. महादरवाज्याचे स्थान, रचना आणि मार्ग यामध्ये रणनीतीचा वापर केला गेला. म्हणूनच हत्तींसारख्या शक्तिशाली हल्ल्यांनाही हा दरवाजा तग धरू शकला.

raigad fort information

Chhatrapati Shivaji Maharaj history: अफजलखानाचा वध केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरी सैन्यासोबत काय केलं?

येथे क्लिक करा