Mumbai Mhada Lottery Saam tv
मुंबई/पुणे

MHADA Lottery: म्हाडाची ५३५४ घरं आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी लॉटरी कधी निघणार? वाचा वेळापत्रक

Mumbai Mhada Lottery Date: म्हाडाच्या लॉटरीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. म्हाडाची ५३५४ घरं आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी लॉटरी ११ ऑक्टोबर रोजी निघणार आहे. याचे अपडेट वेळापत्रक समोर आले आहे.

Priya More

Summary -

  • म्हाडा कोकण मंडळाची लॉटरी ११ ऑक्टोबरला निघणार आहे.

  • या लॉटरीमध्ये ५३५४ सदनिका आणि ७७ भूखंड विक्री होणार आहे.

  • अर्जदारांची अंतिम यादी ९ ऑक्टोबरला जाहीर होईल.

  • निकाल आणि प्रतीक्षा यादी ऑनलाइन प्रसिद्ध होणार आहे

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. ५३५४ सदनिका आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. येत्या ११ ऑक्टोबर रोजी सोडत निघणार आहे. म्हाडा कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या गृहनिर्माण सोडतीसाठी अर्ज केलेले हजारो नागरिक सोडत कधी निघणार याची वाट पाहत होते. या सोडतीची तारीख जाहीर झाली आहे.

ठाणे शहर व जिल्हा तसेच वसई येथील विविध प्रकल्पांतर्गत बांधलेल्या ५३५४ सदनिका आणि ओरोस (जि. सिंधुदुर्ग), कुळगाव-बदलापूर येथील ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत आता ११ ऑक्टोबर २०२५ रोजी ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात पार पडणार आहे. मंडळाच्या मुख्य अधिकारी श्रीमती रेवती गायकर यांनी ही माहिती दिली.

वेळापत्रक -

१ ऑक्टोबर २०२५, सायं. ६.०० वा. – स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध.

३ ऑक्टोबर २०२५, सायं. ६.०० वा. पर्यंत – ऑनलाईन दावे व हरकती नोंदविण्याची मुदत.

९ ऑक्टोबर २०२५, सायं. ६.०० वा. – अंतिम यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध.

११ ऑक्टोबर २०२५ – संगणकीय सोडत व निकाल जाहीर.

सोडतीचे घटक :

सर्वसमावेशक योजनेअंतर्गत – ५६५ सदनिका

एकात्मिक शहर गृहनिर्माण योजना – ३००२ सदनिका

म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका – १७४६ सदनिका

परवडणाऱ्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत – ४१ सदनिका

भूखंड विक्रीसाठी – ७७ भूखंड

या सोडतीसाठी तब्बल १,८४,९९४ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी १,५८,४२४ अर्ज अनामत रकमेसह वैध ठरले आहेत.

सोडतीचे निकाल आणि प्रतीक्षा यादीतील नावे देखील म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://housing.mhada.gov.in) प्रसिद्ध केली जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : निवडणुकीपूर्वी महायुतीत वादाचा भडका! शिंदे सेना-भाजप आमनेसामने

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना धमकी देणारा त्यांच्याच जवळचा, ओबीसी नेत्याच्या दाव्याने खळबळ

Masala Papad Recipe: हॉटेलस्टाईल मसाला पापड घरी कसा बनवायचा?

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

Pune Politics : अमोल कोल्हे यांना मोठा धक्का; जवळच्या कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश, पुण्यातील समीकरण बदलणार?

SCROLL FOR NEXT