MHADA: घराचं स्वप्न लांबणीवर! लॉटरीसाठी म्हाडाकडून नवा मुहूर्त; घरांसाठी कधी निघणार सोडत?

MHADA Housing Lottery Delayed: मुंबईतील म्हडाच्या घरांची लॉटरी मार्च २०२६ मध्ये निघण्याची शक्यता आहे. आचारसंहितेमुळे कोणताही नवा उपक्रम जाहीर करता येत नसल्याने ही सोडत लांबणीवर पडलीय.
MHADA Housing Lottery Delayed
Mumbai MHADA housing lottery postponed – new date likely in March 2026.saam tv
Published On
Summary
  • म्हाडाने जाहीर केलेली घरांची लॉटरी आचारसंहितेमुळे पुढे ढकलली.

  • उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी मार्च 2026 मध्ये लॉटरीची शक्यता वर्तवली.

  • या निर्णयामुळे मुंबईकरांमध्ये नाराजी आणि निराशा पसरली आहे.

संजय गडदे, साम प्रतिनिधी

मुंबईकरांचे परवडणाऱ्या घराचे स्वप्न पुन्हा एकदा लांबणीवर गेले आहे. मुंबईकरांसाठी म्हाडाने दिवाळीत मोठ्या लॉटरीची घोषणा केली होती. या वित्तवर्षातच घरांची सोडत काढली जाणार होती. परंतु मुंबईकरांच्या घराच्या स्वप्नात आचारसंहितेचा खोडा पडला. यामुळे मुंबईकरांना मात्र आता लॉटरीची वाट पहावी लागणार आहे.

काही प्रशासकीय अडचणी आणि मुंबई महानगरपालिकेच्या संभाव्य आचारसंहितेमुळे लॉटरी काढता येणार नसल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिलीय. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता ही लॉटरी मार्च २०२६ मध्ये निघण्याची शक्यता आहे. आचारसंहितेमुळे कोणताही नवा उपक्रम जाहीर करता येत नसल्याने मुंबईकरांना आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे. या निर्णयामुळे स्वस्तात म्हाडाच्या घराच्या लॉटरीचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो मुंबईकरांमध्ये नाराजीची भावना आहे.

MHADA Housing Lottery Delayed
MHADA Housing Lottery:पुण्यानंतर सोलापूर, कोल्हापूर, सांगलीतही म्हाडाच्या घरांची लॉटरी; लाभ घेण्यासाठी 'या' ८ गोष्टी अत्यंत महत्वाच्या

दरम्यान, म्हाडा लॉटरीबाबत त्यांनी स्पष्ट केले की, सर्वोच्च न्यायालयातील स्थगितीनंतर प्रकल्पांना हिरवा कंदील मिळाल्याने पुढील दोन-तीन महिन्यांत मुंबईतील गृहनिर्माण प्रकल्पांना मंजुरी मिळेल. त्यामुळे या आर्थिक वर्षाच्या आत, मुंबई बोर्डाची लॉटरी होईल, असा विश्वास आहे.

MHADA Housing Lottery Delayed
CIDCO Lottery 2025: घराचं स्वप्न होईल पूर्ण; नवी मुंबईत सिडकोकडून २२००० घरांची जम्बो लॉटरी

म्हाडाचे डिजिटायझेशनकडे मोठे पाऊल

म्हाडाने नागरिकांसाठी डिजिटल सुविधा अधिक सोयीस्कर करण्याच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलत MhadaSathi हे नवे मोबाईल ॲप लाँच केले आहे. या ॲपद्वारे नागरिक घरासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात, निविदा व एनओसी पाहू शकतात तसेच जमीन भाडेपट्ट्याशी संबंधित माहिती सहज उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, हे एआय-आधारित ॲप असून ऑडिओद्वारेही सर्व माहिती मिळवता येणार आहे

म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सांगितले की, “गेल्या सात-आठ महिन्यांत म्हाडामध्ये अनेक डिजिटायझेशन उपक्रम राबवले आहेत. पहिला सीएफसी नागरिक सुविधा केंद्र उघडले, १५ कोटी डॉक्युमेंट्सचे प्रॊ-ऍक्टिव्ह डिस्क्लोजर केले, तसेच वेबसाईटवर एआय चॅट सुविधा सुरू केली.” जयस्वाल यांनी पुढे सांगितले की, दिवाळीपूर्वी MhadaSathi ॲप नागरिकांसाठी सुरू करण्यात आले असून याचा फायदा मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com