MHADA Housing Lottery:पुण्यानंतर सोलापूर, कोल्हापूर, सांगलीतही म्हाडाच्या घरांची लॉटरी; लाभ घेण्यासाठी 'या' ८ गोष्टी अत्यंत महत्वाच्या

MHADA Housing Lottery Guidelines: म्हाडाने सोलापूर, कोल्हापूर आणि सांगलीसाठी लॉटरीचा शुभारंभ केलाय. म्हाडा आणि पीएमएवाय योजनेअंतर्गत एकूण १९८२ परवडणाऱ्या किमतीचे फ्लॅट्स उपलब्ध आहेत. नोंदणी, अर्ज आणि पेमेंट तपशील येथे तपासा.
MHADA Housing Lottery Guidelines
MHADA announces 1982 flats in Solapur, Kolhapur, Sangli under new housing lotterysaam tv
Published On
Summary
  • पुण्यानंतर म्हाडाची घरांची लॉटरी सोलापूर, कोल्हापूर व सांगली येथे जाहीर.

  • १९८२ सदनिकांसाठी सोडत काढण्यात आली आहे.

  • PMAY व म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत परवडणारी घरे उपलब्ध.

म्हाडाने पुण्यानंतर सोलापूर, कोल्हापूर, सांगलीतही घरांसाठी लॉटरी काढलीय. म्हाडा गृहनिर्माण योजना व PMAY योजनेमधील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर ही लॉटरी काढण्यात आलीय. १९८२ सदनिकांसाठी ही सोडत काढण्यात येत आहे. सदनिकांसाठी अर्ज नोंदणी, ऑनलाईन अर्ज तसेच अनामत रक्कमेचा भरणा, या कार्यक्रमाचा शुभारंभ आज करण्यात आलाय.

म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन सोडतीचा शुभारंभ करण्यात आला. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आमचे आवाहन असून संपूर्ण प्रक्रिया ही पारदर्शक असणार आहे, आढळराव पाटील यांनी सांगितलं. दरम्यान तुम्हालाही घर घ्यायचे असेल तर ८ गोष्टींची काळजी घ्या.

MHADA Housing Lottery Guidelines
Mhada Lottery: दिवाळीपूर्वी हक्काचं घर होणार! म्हाडा वर्षभरात राज्यात १९,४९७ घरे बांधणार; मुंबईकरांना विशेष फायदा

कोणत्या आठ गोष्टी आहेत महत्त्वाच्या

  • उत्पन्ना संबधितः

विवाहीत अर्जदारास त्यांच्या जोडीदाराचे उत्पन्न ही दर्शवावे लागेल. जोडीदाराचे उत्पन्न नसल्यास त्यांना अर्ज करताना शुन्य (०) उत्पन्न दर्शवावे लागेल.

पती-पत्नी यांनी वेगवेगळे अर्ज केले असल्यास दोघांच्याही उत्पन्नामध्ये तफावत आढळून आल्यास ते अर्ज बाद करण्यात येतील.

MHADA Housing Lottery Guidelines
CIDCO Lottery 2025: घराचं स्वप्न होईल पूर्ण; नवी मुंबईत सिडकोकडून २२००० घरांची जम्बो लॉटरी
  • वैवाहिक स्थितीबाबतः-

अ) योग्य ती वैवाहिक स्थिती निवडावी लागेल.

ब) अर्जदार घटस्फोटीत असल्यास त्यांना तसे आदेश अपलोड करावे लागतील.

क) अर्जदार विधवा / विधूर असल्यास पती / पत्नीचा मृत्यु दाखला अपलोड करावा लागेल.

  • संरक्षण दल कुटुंब / माजी सैनिक यांना स्वतंत्रपणे आपले प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल.

  • अधिवास (डोमासाईल) प्रमाणपत्रः- बारकोड असणारे २०१८ नंतरचेच स्विकारण्यात येतील.

  • QR Code संबधात नमुना वाटप आदेश, वाटप आदेश, ताबापत्र, ताबा पावती इत्यादीवर QR Code दर्शविण्यात येईल.

  • DIGI Locker:-

    अर्जदाराचे तसेच अर्जदाराच्या जोडीदाराचे आधारकार्ड व पॅनकार्डहे डीजी लॉकर या वरूनच प्राप्त करून घेणे गरजेचे आहे. त्याकरीता अर्जदारास डीजी लॉकर वर नोंदणीकरून आवश्यक माहिती अद्यावत करावी लागेल.

  • सोडतीमधील घरांच्या नोंदणीसाठी बोर्डाच्या या संकेतस्थळाला भेट द्यावी.

  • प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरील सदनिकांसाठी अर्ज नोंदणी करीता म्हाडाच्या वेबसाईट वर संकेतस्थळांना भेट द्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com