
सिडकोनं २०२५ साली तब्बल २२,००० घरांची जम्बो लॉटरी जाहीर केली.
ही लॉटरी नवी मुंबई परिसरातील नागरिकांसाठी काढली जाणार आहे.
घरांच्या स्वप्नपूर्तीसाठी सिडकोकडून मोठं पाऊल उचललं गेलं आहे.
म्हाडाप्रमाणे औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) कार्य करते. नवी मुंबईत सर्वसामान्य नागरिकांना हक्काचं घर मिळावं, यासाठी सिडकोकडून घरं उपलब्ध करून दिली जातात. जे लोक नवी मुंबईत घर घेण्याचा विचारात असतील त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. म्हाडा पाठोपाठ आता सिडकोनं घरांची सिडकोनं नवी मुंबईतील तब्बल २२०० घरांची लॉटरी काढलीय.
म्हाडा किंवा सिडकोच्यावतीने दरवर्षी घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढली जाते. सणासुदीच्या मुहूर्तावर लॉटरी जाहीर केली जात असते. म्हाडाच्या कोकण मंडळाच्यावतीने घरांची लॉटरी नुकतीच जाहीर झाली आहे. त्यानंतर आता नवी मुंबईतील घरांसाठी सिडकोच्यावतीने लॉटरी काढण्यात येणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर सिडकोची लॉटरी जाहीर होणार असून या लॉटरी संदर्भात अधिकृत घोषणा लवकर केली जाणार आहे.
दरम्यान सिडकोच्या घराचे किमती कमी होण्याची शक्यता आहे. म्हाडाच्या तुलनेत सिडकोच्या किमती काहीशा जास्त असल्याने नागरिक या लॉटरीकडे पाठ फिरवत असतात. घरांच्या किमती कमी करण्याची मागणी ग्राहकांकडून सातत्याने होतेय. त्यामुळेच आता घरांच्या किमतींसंदर्भात निर्णयासाठी नगरविकास विभागाने एक विशेष बैठक बोलावलीय. या बैठकीत घरांच्या किमीत कमी करण्याच्या संदर्भात निर्णय घेतला जाईल अशी शक्यता आहे.
सिडकोच्या लॉटरीतील घरे नवी मुंबईतील वाशी, जुईनगर, खारघर तर पनवेलमधील तळोजा, द्रोणागिरी या ठिकाणी असतील असं म्हटलं जात आहे. लवकरच या लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या जाहिरातीत घरं नेमकी कुठं आणि त्यांची किंमत किती याबाबतची माहिती दिली जाणार आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने घरांच्या किमती कमी केल्यास लॉटरी काढण्यास सिडको पूर्णपणे तयार आहे. सिडकोची घरं बाजारमूल्यापेक्षा कमी किमतीची आहेत. खासगी बिल्डर्सच्या इमारतींपेक्षा दर्जेदार आहेत. यामध्ये 25 लाखांपर्यंतची घरं उपलब्ध असून घराची किंमत त्याच्या स्थानानुसार ठरवली जात असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.