Pune Mhada Lottery: पुण्यात स्वस्तात मस्त घर, म्हाडाच्या घरासाठी अर्ज कसा कराल? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Pune Mhada Lottery 2025 Application Process: पुणे म्हाडा मंडळाने नवीन लॉटरी जाहीर केली आहे. ६१६८ घरांसाठी ही लॉटरी निघणार आहे. यासाठी अर्ज कसा करावा ते जाणून घ्या.
Pune MHADA Lottery
Pune Mhada Lottery Saam TV
Published On
Summary

पुण्यात म्हाडाच्या घरांसाठी सोडत

६१६८ घरांसाठी निघाली लॉटरी

अर्ज कसा करावा?

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. म्हाडाने पुण्यातील घरांसाठी लॉटरी काढली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाकडून ६१६८ घरांसाठी लॉटरी काढण्यात आली आहे. यातील १९८२ घरे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या अंतर्गत विक्री केली जाणार आहे. या लॉटरीच्या माध्यमातून पुण्यात कमी दरात घरे उपलब्ध केली आहेत. त्यामुळे पुणेकरांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. दरम्यान, पु्ण्यातील घरांसाठी अर्ज कसा करायचा याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

Pune MHADA Lottery
Pune MHADA Lottery: पुण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार, म्हाडाच्या ६२९४ घरांची लॉटरी जाहीर

पुण्यातील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज कसा करावा?(Pune Mhada Housing Application Process)

तुम्हाला सर्वात आधी housing.mhada.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे. किंवा म्हाडाच्या ऑनलाइन अॅपवर जावे. यानंतर तुम्ही सर्वात आधी नोंदणी करा आणि माहिती काळजीपूर्वक वाचा.यानंतर तुम्हाला माहिती भरायची आहे.

अर्ज करताना कागदपत्रे (Mhada Application Required Documents)

अर्जदाराचे आधार आणि पॅन कार्ड, लग्न झाले असेल तर पती पत्नी दोघांचे आधार आणि पॅन कार्ड.

घराचा संपूर्ण पत्ता, पोस्टाचा पिन कोड

आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी

अर्जदाराचे रहिवासी प्रमाणपत्र (२०१८ नंतरचे असावे) त्यावर बारकोड असावा

पात्र उत्पन्न गटानुसार तुमचे आयकर विवरण पत्र किंवा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला

जातीचा दाखला, जात पडताळमी प्रमाणपत्र

अर्जदाराच्या बँकेचे नाव, अकाउंट नंबर. आयएफएसी कोड नंबर याबाबत सर्व माहिती भरायची आहे.

Pune MHADA Lottery
Pune Mhada Lottery: पुण्यात घराचं स्वप्न साकार होणार! म्हाडाची ४१८६ घरांसाठी बंपर लॉटरी; वाचा सविस्तर

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाइन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या प्रवर्गातून एकापेक्षा जास्त अर्ज करु शकतात. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही लॉग इन करावे. यानंतर फॉर्म भरावा. या घरांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २२५ असणार आहे. यानंतर तुम्ही अर्ज करु शकणार नाही. अर्ज केल्यानंतर एकदा शुल्क भरले की तुम्हाला अर्जात कोणताही बदल करण्यात येणार नाही.

पुण्यातील घरांसाठी अर्ज केल्यानंतर तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्जाचे शुल्क भरु शकतात. दरम्यान, तुम्ही जर एकापेक्षा जास्त सोडतीसाठी अर्ज केला असेल तर त्यासाठी वेगवेगळे शुल्क भरावे लागणार आहे. दरम्यान, अर्जाची सोडत जाहीर झाल्यानंतर तुम्हाला १० दिवसांत स्विकृती पत्र सादर करणे आवश्यक आहे.

Pune MHADA Lottery
Mhada Home : म्हाडाची जम्बो लॉटरी, प्राईम लोकेशनवर तब्बल ६१६८ घरे, कोणत्या ठिकाणी मिळणार हक्काचे घर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com