म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ६ हजार घरांसाठी सोडत आज निघाली. आज ऑनलाइन पद्धतीने सोडत काढण्यात आली. पुणे, पिंपरी चिंचवड आणि सोलापूरमधील म्हाडाच्या घरांचा यामध्ये समावेश आहे. मार्चमध्ये काढण्यात आलेल्या सोडतीत म्हाडाने स्वतः बांधलेल्या २ हजार १४६ घरांची विक्री काढलेली होती. मात्र त्यातील केवळ ७६ घरांची विक्री झाली. मात्र आज ऑनलाइन पद्धतीने सोडत काढली. या सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ अर्थात म्हाडाच्या वतीने या वर्षातील दुसरी सोडत आज निघली. आज पुण्याच्या म्हाडामधील ६ हजार २९४ सदनिकांची ऑनलाइन सोडत काढण्यात आली. पुण्यासह पिंपरी-चिंचवड, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील घरांचा यामध्ये समावेश आहे. म्हाडाच्या सहा हजार २९४ सदनिकांमध्ये म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत उपलब्ध २,३४० सदनिकांचा समावेश आहे. या सदनिकांच्या ऑनलाइन सोडतीचा प्रारंभ आज म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते झाले.
पुणे मंडळातर्फे सदनिका विक्रीसाठी ऑनलाईन संगणकीय सोडत ५ डिसेंबर २०२४ रोजी काढण्यात येणार आहे. १० ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. नोंदणीकृत अर्जदार १० ऑक्टोबर २०२४ रोजी १२ वाजेपासूनच ऑनलाइन पेमेंट देखील करू शकणार आहेत. तसेच ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया १२ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता बंद होणार आहे. तर अर्जदारांना १२ नोव्हेबर २०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन पेमेंट करता येणार आहे.
१३ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ७ वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवर केली जाणार आहे. २७ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादीवर आपल्या हरकती नोंदविता येणार आहेत. ३० नोव्हेंबर रोजी सोडतीमध्ये सहभागी झालेल्या अर्जांची यादी म्हाडाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.