UPI Transaction Limit : ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांना मोठा दिलासा; आरबीआयने वाढवली UPI Lite पेमेंटची मर्यादा

RBI Increased UPI Lite Limit : आरबीआयने UPI Lite द्वारे केल्या जाणाऱ्या पेमेंटच्या मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
UPI Lite
RBI increased UPI Lite Limit Saam TV
Published On

RBI increased the UPI Lite limit: तुम्ही जर कोणत्याही व्यवहारासाठी ऑनलाइन पेमेंट करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, आजपासून तुम्हाला मोठा फायदा मिळणार आहे. आरबीआयने UPI Lite द्वारे केल्या जाणाऱ्या पेमेंटच्या मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता युजर्स एका दिवसात UPI लाइट वॉलेटद्वारे 5,000 रुपयांपर्यंत पेमेंट करू शकणार आहे. याआधी ही मर्यादा 2,000 रुपये इतकी होती. मात्र, आरबीआय गवर्नर शक्तीकांत दास यांनी आज यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

UPI Lite
RBI MPC Meet 2024: आरबीआयचा रेपो रेटबाबत मोठा निर्णय, गृह आणि कार लोनमध्ये बदल होणार?

याशिवाय आरबीआयने UPI 123Pay द्वारे व्यवहाराची मर्यादा वाढवण्याचा देखील निर्णय घेतला आहे. आजपासून UPI 123Pay द्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहाराची मर्यादा 10,000 रुपये करण्यात आली आहे. याआधी ही मर्यादा फक्त 5,000 रुपये इतकीच होती. म्हणजेच आता तुम्ही UPI लाइट वॉलेटद्वारे 5,000 रुपयांपर्यंत पेमेंट करू शकता.

आरबीआयची आज पतधोरण बैठक पार पडली. या बैठकीनंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पतधोरण समितीनं घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. आरबीआयने रेपो रेट 6.5 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. तसंच, आर्थिक वर्ष 2025 चा जीडीपी विकास दर आणि महागाईचा अंदाजही कायम ठेवला आहे.

रेपो रेटमध्ये कोणताही बदल न झाल्यामुळे कर्जाच्या हप्त्यात बदल होणार नाही. गृहकर्ज किंवा वैयक्तिक कर्जाचा कुठलाही अतिरिक्त भार सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार नाही. दुसरीकडे आरबीआयच्या या निर्णयामुळे पुढील आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीसाठी ग्राहक किंमत निर्देशांक महागाई दर 4.3 टक्के राहण्याचा अंदाज आहे.

UPI 123Pay वैशिष्ट्य काय आहे?

UPI 123Pay ही पेमेंट सिस्टम खास मोबाइल वापरकर्त्यांसाठी आहे. या सिस्टिमद्वारे युजर्स सुरक्षित आणि विश्वासार्ह मार्गाने UPI पेमेंट वापरू शकतात. UPI 123Pay द्वारे, फोन वापरकर्ते चार तंत्रज्ञान पर्यायांवर आधारित विविध प्रकारचे व्यवहार करू शकतात. यामध्ये IVR नंबरवर कॉल करणे, फीचर फोनमधील ॲप कार्यक्षमता, मिस्ड कॉल-आधारित आणि प्रॉक्सिमिटी साउंड आधारित पेमेंट यांचा समावेश आहे.

UPI Lite
Unified Pension Scheme : काय आहे यूनिफाइड पेन्शन स्कीम; योजनेचा लाभ केव्हापासून घेता येणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com