Mhada Home : म्हाडाची जम्बो लॉटरी, प्राईम लोकेशनवर तब्बल ६१६८ घरे, कोणत्या ठिकाणी मिळणार हक्काचे घर

Pune Mhada Lottery : ६१६८ घरे उपलब्ध असून त्यात पुणे, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए तसेच सोलापूर, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांचा समावेश आहे. उत्पन्न दाखला, वैवाहिक स्थितीशी संबंधित प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र (२०१८ नंतरचे), आधारकार्ड व पॅनकार्ड (डीजी लॉकरवरून), तसेच संरक्षण दल कुटुंबाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
MHADA news
MhadaSaam tv
Published On
Summary
  • पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए परिसरात म्हाडाच्या ६१६८ घरांची लॉटरी जाहीर.

  • १५% सामाजिक गृहनिर्माण व २०% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनांचा समावेश.

  • अर्जासाठी उत्पन्न दाखला, अधिवास प्रमाणपत्र, आधार-पॅनकार्ड (डीजी लॉकरमधून) बंधनकारक.

  • प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावरील सदनिकांसाठीही अर्जाची सोय उपलब्ध.

MHADA lottery 6168 flats application process : पुण्यामध्ये हक्काचे घरं शोधणाऱ्यांना म्हाडाकडून खुशखबर देण्यात आली आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल ६१६८ घरांसाठी लॉटरी काढण्यात आली आहे. पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए येथे प्राईम लोकेशनवर ही घरं आहेत. घरासाठी अर्ज नोंदणी, ऑनलाईन अर्ज तसेच अनामत रक्कमेचा भरणा, या कार्यक्रमाचा शुभारंभ शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

पुण्यामध्ये १५% सामाजिक गृहनिर्माण व २०% सर्वसमावेशक योजनेतील ४१८६ सदनिकांची ऑनलाईन सोडतीचा शुभारंभ करण्यात आला. तसेच सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील म्हाडा गृहनिर्माण योजना व PMAY योजनेमधील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर १९८२ सदनिकांचा समावेश करण्यात आलाय. अशा एकूण ६१६८ सदनिकांसाठी म्हाडाने सोडत जाहीर केली. Affordable MHADA homes in Pune, Solapur, Kolhapur and Sangli

MHADA news
Maratha Reservation : १० टक्के आरक्षण नको का? भुजबळांचा मराठा समाजाला सवाल

पुण्यातील म्हाडा कार्यालय येथे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या ४१८६ घरांच्या ऑनलाईन सोडतीचा शुभारंभ करण्यात आला. म्हाडाकडून १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण व २० टक्के सर्व समावेशक गृहनिर्माण योजनांमध्ये पुणे महापालिका क्षेत्रात १५३८, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात १५३४,आणि पुणे महानगर प्रदेशविकास प्राधिकरण मध्ये १११४ असे एकूण ४१८६ सदनिका आहे. तर म्हाडा गृहनिर्माण योजने अंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अस १६८३ सदनिका तर म्हाडा PMAY योजनेत २९९ असे एकूण ६१६८ सदनिका असतील.

MHADA news
Latur OBC News : मराठा आरक्षणासाठी GR, ओबीसी तरूणाने आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीत काय लिहिले?

How to apply online for MHADA housing scheme in Pune

१. उत्पन्ना संबधितः-

अ) विवाहीत अर्जदारास त्यांच्या जोडीदाराचे उत्पन्न ही दर्शवावे लागेल. जोडीदाराचे उत्पन्न नसल्यास त्यांना अर्ज करताना शुन्य (०) उत्पन्न दर्शवावे लागेल.

ब) पती-पत्नी यांनी वेगवेगळे अर्ज केले असल्यास दोघांच्याही उत्पन्नामध्ये तफावत आढळून आल्यास ते अर्ज बाद करण्यात येतील.

२: वैवाहिक स्थितीबाबतः- Eligibility criteria for MHADA Pune and PCMC housing lottery

अ) योग्य ती वैवाहिक स्थिती निवडावी लागेल.

ब) अर्जदार घटस्फोटीत असल्यास त्यांना तसे आदेश अपलोड करावे लागतील.

क) अर्जदार विधवा / विधूर असल्यास पती / पत्नीचा मृत्यु दाखला अपलोड करावा लागेल.

३. संरक्षण दल कुटुंब / माजी सैनिक यांना स्वतंत्रपणे आपले प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल.

४. अधिवास (डोमासाईल) प्रमाणपत्रः- बारकोड असणारे २०१८ नंतरचेच स्विकारण्यात येतील.

५. QR Code संबधात नमुना वाटप आदेश, वाटप आदेश, ताबापत्र, ताबा पावती इत्यादीवर QR Code दर्शविण्यात येईल.

६. DIGI Locker:- अर्जदाराचे तसेच अर्जदाराच्या जोडीदाराचे आधारकार्ड व पॅनकार्डहे डीजी लॉकर या वरूनच प्राप्त करून घेणे गरजेचे आहे. त्याकरीता अर्जदारास डीजी लॉकर वर नोंदणीकरून आवश्यक माहिती अद्यावत करावी लागेल.

७. सोडतीमधील घरांच्या नोंदणीसाठी बोर्डाच्या या संकेतस्थळाला भेट द्यावी.

८. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरील सदनिकांसाठी अर्ज नोंदणी करीता म्हाडाच्या वेबसाईट वर संकेतस्थळांना भेट द्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com