Chhagan Bhujbal questions Maratha community on SEBC and EWS quota : SEBC १० टक्के, EWS १० टक्के आणि खुल्या वर्गातील आरक्षण नको का ? असा सवाल छगन भुजबळ यांनी असा सवाल मराठा समाजाला विचारला आहे. ओबीसी आरक्षण हवं असल्यास तुम्हाला इतर सवलती आणि आरक्षण नको का ?
SEBC १० टक्के, EWS १० टक्के आणि खुल्या वर्गातील आरक्षण नको का ? अशिक्षित लोकांकडून अपेक्षा नाही, सुशिक्षित लोकांनीच उत्तर द्यावी, अशी मागणी भुजबळांनी केला. छगन भुजबळांच्या मागणीने मराठा समाजातील आजी माजी नेत्यांची कोंडी होण्याची शक्यता वर्तवली आहे.
सुशिक्षित मराठे आहेत, जे मुख्यमंत्री, आमदार, खासदार झालेत ज्यांना आरक्षण काय कळतंय, त्यांना विनंती करतोय. आर्थिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास मात्र सामाजिक दृष्ट्या मागास नाही अशांना १० टक्के आरक्षण दिलं. त्यात ८० टक्के मराठा समाज आहे. पुन्हा मराठा समाजाकडून आरक्षणाची मागणी होतेय. मराठा समाजाला ओबीसीमध्ये घ्या अशी आंदोलनं होत आहेत. तुम्हाला १० टक्क्यांचे आरक्षण नको का? असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.