म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी हाती आली आहे. म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. म्हाडाच्या घरांच्या किमतीचं नवं सूत्र ठरवण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीकडून सर्वसामान्यांना स्वस्तात घर मिळेल आणि म्हाडाचं देखील नुकसान होणार नाही यादृष्टीनं अभ्यास केला जाणार आहे. समितीच्या अभ्यासाने म्हाडाचं घर घेणाऱ्यांना सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
म्हाडाकडून घराच्या किमतीचं नवं सूत्र लवकरच येणार आहे. विक्रीअभावी पडून राहणारी घरं हातोहात खपावीत म्हणून म्हाडा ही नवी शक्कल लढवत आहे. त्यासाठी महागड्या घरांच्या विक्रीसाठी क्षेत्रफळाऐवजी किमतीनुसार उत्पन्न गट ठरवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. म्हाडाच्या घरांची किंमत कमी होण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात समिती आपला अहवाल उपाध्यक्षांकडे सादर करणार आहेत. त्यानंतर अहवाल मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला जाणार आहे.
म्हाडाच्या धोरणानुसार, ३०० चौरस फुटांपर्यंत घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध असतात. तर ४५० चौरस फुटांपर्यंतची घरे अल्प उत्पन्न गटासाठी आहेत. तर ६०० चौरस फुटापर्यंतची घरे मध्यम उत्पन्न गटासाठी आहेत. तसेच 900 चौरस फुटापर्यंतची घरे उच्च उत्पन्न गटासाठी आहेत. मुंबई उपनगरातील ३०० चौरस फुटाच्या घराची किंमत आणि तितक्याच क्षेत्रफळाच्या दक्षिण मुंबईतील घराची किंमतीत मोठा फरक असतो. त्यामुळे घराच्या क्षेत्रफळाऐवजी किमतीनुसार उत्पन्न गट ठरवता येतील का, याचा अभ्यास केला जाणाार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
म्हाडाच्या घरांच्या किमती या जमिनीचा खर्च, बांधकाम खर्च आणि आस्थापन खर्च याचा विचार करून निश्चित केल्या जातात. अत्यल्प आणि अल्प गटातून म्हाडा कोणताही नफा घेत नाही. म्हाडाने एखादा भूखंड हा दहा-बारा वर्षांपूर्वी खरेदी केला असेल. या भूखंडाच्या सुरक्षेसाठी मोठा खर्च केला असेल. तर तो खर्च देखील घराच्या किंमतीत समावेश केला जातो. त्यामुळे घराच्या किमतीत वाढ होते.
एखाद्या भूखंडावर उशिराने इमारत बांधली गेल्यास त्याचा भुंर्दंड सर्वसामान्यांनी का सहन करायचा, असा सवाल आता उपस्थित होत आहे. त्यामुले प्राधिकरणाचे नुकसान होता सर्वसामान्यांना स्वस्तात घरे मिळाली पाहिजे. त्यामुळे म्हाडाची घरे स्वस्त कशाप्रकारे मिळतील, त्याचाही अभ्यास समितीकडून केला जाणार असल्याची माहिती म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.