Mumbai MHADA : मोठी बातमी! मुंबईत म्हाडाच्या ९५ इमारती अती धोकादायक, नोटीस धडकणार

Mumbai MHADA News : म्हाडाच्या स्ट्रक्चरल ऑडिटमधून मुंबईतील ९५ इमारती अती धोकादायक (C-1) असल्याचे स्पष्ट झाले आहे. रहिवाशांना लवकरच रिकामी करण्याची नोटीस देण्यात येणार आहे.
Mhada News
Mhada Newssaam tv
Published On

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Mumbai MHADA Latest News update : मुंबईतील जुन्या आणि जीर्ण झालेल्या इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईमध्ये म्हाडाच्या तब्बल ९५ इमारती अति धोकादायक असल्याचे समोर आलेय. इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली. या इमारतींमधील रहिवाशांच्या जीविताला धोका टाळण्यासाठी म्हाडा लवकरच या इमारती रिकाम्या करण्यासाठी नोटीसा पाठवमार आहे. आवश्यकतेनुसार रहिवाशांना संक्रमण शिबिरात सदनिका उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती मिळाली..

३० वर्षांहून अधिक काळ झालेल्या इमारती धोकायदायक असल्याचं समोर आले आहे. पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींची पाहणी आणि स्ट्रक्चरल ऑडिट करणे बंधनकारक असते. त्यानुसार, यंदा म्हाडाने गेल्या दोन महिन्यांत ६२५ इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण केले. यापैकी ९५ इमारती अति-धोकादायक (सी-1), तर १२८ इमारती धोकादायक (सी-2 अ) गटात आढळल्या आहेत. सी-2 (अ) गटातील इमारतींना तातडीने मोठी दुरुस्ती आवश्यक आहे.

Mhada News
Maharashtra Politics: राज-उद्धव ठाकरेंचा बॅनर एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात, मराठी माणसासाठी एकत्र या, घातली साद

अति-धोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे. त्याशिवाय सुरक्षिततेच्या दृष्टीने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असेबी त्यांनी म्हटलेय. "या इमारती कोसळल्यास जीवित आणि वित्तहानी होऊ शकते. रहिवाशांनी वेळीच स्थलांतर करावे," असे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Mhada News
Congress : काँग्रेसला आणखी एक धक्का, थोपटेंनंतर आणखी एका नेत्याने 'हात' सोडला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com