Pune Politics Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Politics: पुण्यात मोठा राजकीय भूकंप, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढली; १० दिग्गज नेत्यांचा पक्षप्रवेश

Ajit Pawar Expands Base in Pune: पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढली. भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि मनसेच्या १० दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आणखी काही नेते आजही राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Priya More

Summary -

  • पुण्यात अजित पवार गटाची ताकद वाढली

  • भाजप, काँग्रेस, शिवसेना, मनसेतील १० दिग्गजांचा राष्ट्रवादीत प्रवेश

  • महापालिका निवडणुकीपूर्वी पुण्यात मोठा राजकीय भूकंप

  • अजित पवारांच्या उपस्थितीत रात्री उशिरापर्यंत पक्षप्रवेश

सचिन जाधव, पुणे

महानगर पालिका निवडणुकीच्या रणधुमाळी दरम्यान पुण्यात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ताकद वाढली आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि मनसेच्या अनेक दिग्गज नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. पुण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत या घडामोडी घडल्या. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये या सर्वांचा पक्षप्रवेश झाला. पालिका निवडणुकीदरम्यान पुण्यात झालेल्या या राजकीय भूकंपामुळे भाजप आणि शिवसेनेसह इतर पक्षाला मोठा हादरला बसला आहे. तर आणखी काही नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यात अजित पवार गट सुसाट आहेत. सोमवारी दुपारपासून रात्रीपर्यंत १० जणांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सोमवारी एका दिवसात सर्व पक्षातील माजी नगरसेवकांसह अनेक स्थानिक नेत्यांनी प्रवेश केला. आजही अनेक जण प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. भाजप, मनसे, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून १० जणांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे अजित पवारांनी निवडणुकीची चांगली वेळ साधली असल्याची चर्चा पुण्यात सुरू आहे.

पुणे शहरातील या मुख्य १० नेत्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश -

१) धनंजय जाधव - भाजप

२) जयराज लांडगे - मनसे

३) दत्ता बहिरट - काँग्रेस

४) शंकर पवार - भाजप

५) मुकारी अलगुडे - भाजप

६) नीता मांजळकर - शिवसेना ठाकरे गट

७) आनंद मांजळकर - शिवसेना

८) स्वप्निल दुधाने - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट

९) मधुकर मुसळे - भाजप

१०) प्रकाश ढोरे - मनसे

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित निवडणूक लढवत आहेत. ४० जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तुतारी चिन्हावर निवडणूक लढवतील. तर अजित पवारांची राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर १२५ जागांवरती निवडणूक लढवतील. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अंकुश काकडे, विशाल तांबे आणि इतर पदाधिकारी जागावाटप संदर्भात निर्णय घेत आहेत. तर पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीत मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.पिंपरी-चिंचवडमध्ये १२८ पैकी पिंपरीमध्ये १८ जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला म्हणजेच तुतारीला देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ, नवीन वेतनश्रेणी कधी लागू होणार? मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update: शिर्डी पोलिस मागणार भोंदू अशोक खरातचा ताबा

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंचं पक्षात सर्जिकल स्ट्राइक; ऑपरेशन टायगरच्या चर्चेदरम्यान बड्या नेत्याला पदावरून हटवलं

तुम्हाला Ladki Bahin Yojana ची eKYC करून देतो, महिलेचा मोबाइल घेऊन इन्स्टाग्राम अकाउंट बनवलं, नंतर इतरांना अश्लील व्हिडीओ पाठवले

Honey Bee Attack: वेरूळ लेणी पहायला गेले असता भयंकर घडलं; 100 पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला

SCROLL FOR NEXT