Pune Nagpur Trains
Pune Nagpur TrainsSaam tv

Pune Nagpur Trains: पुणे नागपूरसाठी ३ विशेष रेल्वे, २२ वेळा ये-जा करणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक

Pune Nagpur Special Trains: नवीन वर्षाच्या सुरुवातीला पुणे-नागपूर आणि हडपसर नागपूरसाठी विशेष रेल्वे सेवा सोडणार आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
Published on
Summary

नवीन वर्षात विशेष रेल्वे फेऱ्या

पुणे-नागपूर, हडपसर नागपूरसाठी विशेष रेल्वे सोडणार

प्रवाशांना मिळणार दिलासा

रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढती गर्दी पाहता पुणे- नागपूर, हडपसर पुणे आणि हडपसर रानी कमलपति यासाठी विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष रेल्वे ट्रेनमुळे प्रवाशांना खूप फायदा होणार आहे. या ट्रेन जळगावमधील चाळीसगावसगह पाचोरा, जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबणार आहे. यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळू शकणार आहे.

रेल्वेच्या या विशेष वेळापत्रकाची माहिती प्रवाशांना देण्यात आली आहे. प्रवाशांना http://www.enquiry.indianrail.gov.in या वेबसाइटवर सर्व माहिती मिळणार आहे. याचसोबत तुम्ही एनटीईएसवरुन डाउनलोड करु शकतात.

Pune Nagpur Trains
Vande Bharat Train : झणझणीत मिसळ अन् चविष्ट पुरणपोळी, आता वंदे भारतमध्ये मराठमोळं जेवण

३ विशेष ट्रेन आणि २२ फेऱ्या

पुणे नागपूर विशेष ट्रेन (Pune Nagpur Special Train)

पुणे नागपूर ०१४१९ ही विशेष ट्रेन २७,२९, ३१ डिसेंबर आणि ३ जानेवारीला पुण्यातून ८.३० वाजता सुटणार आहे. ही गाडी २.०५ वाजता नागपूरला पोहचेल. ०१४२० ही विशेष गाडी २८, ३० डिसेंबर तसेच १ आणि ४ जानेवारीला दुपारी ४च्या सुमारास निघेल आणि दुसऱ्या दिवशी ११.४५ मिनिटांनी पुण्याला पोहचेल. ही ट्रेन दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगांव आणि वर्धा स्थानकांवर थांबेल.

हडपसर नागपूर (Hadapsar Nagpur Train)

हडपसर नागपूर ०१२२२ ही विशेष ट्रेन धावणार आहे. या ट्रेनच्या ८ फेऱ्या होणार आहे. ही ट्रेन २८,३० डिसेंबर आणि १,४ जानेवारीला हडपसर येथून नागपूरला जाईल. ही ट्रेन दुपारी ३.५० ला निघेल आणि सकाळी ६.३० ला नागपूरला पोहचेल. तर ०१२२१ ही विशेष गाडी २६, २९, ३१ डिसेंबर आणि २ जानेवारीला नागपूरवरुन हडपसरला येईल.ही ट्रेनदेखील पुणे नागपूर ट्रेनच्या थांब्यावर थांबेल.

Pune Nagpur Trains
Pune-Nagpur Vande Bharat Train: पुणे - नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मोठा बदल, रेल्वेने नेमका काय घेतला निर्णय?

हडपसर–राणी कमलापती विशेष गाडी

हडपसर–राणी कमलापती ०२१५५ विशेष गाडी १८ ते ११ जानेवारी या काळात प्रत्येक रविवारी सुटणार आहे. ही गाडी सकाळी ७.५० ला सुटणार आहे. त्याच दिवशी रात्री ११.४० वाजता राणी कमलापती येथे पोहचेल. तर , ०२१५६ ही ट्रेन प्रत्येक शनिवारी सकाळी ८.४० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे हडपसरला पोहचेल.

Pune Nagpur Trains
Pune-Nagpur Vande Bharat Train: पुणे - नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मोठा बदल, रेल्वेने नेमका काय घेतला निर्णय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com