WTC 2027 Final: टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा मार्ग खडतर? जाणून घ्या कसं आहे संपूर्ण समीकरण

World Test Championship 2025-27: न्यूझीलंडविरुद्धची पहिली टेस्ट ड्रॉ झाल्याने भारताच्या WTC फायनलमध्ये पोहोचण्याच्या अडचणी वाढल्या आहेत. उर्वरित सहा सामन्यांमध्ये टीम इंडियाला किती विजय मिळवावे लागतील? ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या निकालांचा भारताला कसा फायदा होईल, जाणून घ्या.
World Test Championship 2025-27
World Test Championship 2025-27saam tv
Published On: 

भारतीय क्रिकेट टीमसाठी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 च्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग आता कठीण झालाय. न्यूझीलंडविरुद्धची पहिली टेस्ट ड्रॉ झाल्यामुळे भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. उर्वरित सहाही सामने जिंकले तरी टीम इंडियाचं फायनलमधील स्थान निश्चित होणार नाही. या स्पर्धेत भारताला आता आणखी सहा सामने खेळायचे आहेत. त्यापैकी दुसरी टेस्ट न्यूझीलंडविरुद्ध तर पुढील पाच सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात होणार आहेत. पण भारताच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा अजूनही कायम आहेत. त्यासाठी नेमकं कसं गणित आहे ते जाणून घेऊया

पहिली टेस्ट ड्रॉ राहिल्याने भारताला फटका

न्यूझीलंडविरुद्धची पहिली टेस्ट भारतीय टीमला जिंकण्याची संधी होती. हा सामना भारताने जिंकला असता, तर पॉईंट्स टेबलची परिस्थिती चांगली झाली असती. सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी न्यूझीलंडच्या 8 विकेट्स काढायच्या होत्या. पण भारतीय गोलंदाजांना केवळ तीन विकेट घेता आल्या.

World Test Championship 2025-27
Shubman Gill catch: शुभमन गिलचा 'सुपरमॅन कॅच' पाहिलात का? तुम्हीही व्हाल हैराण, पाहा Video

याशिवाय भारतीय फलंदाजांनी या सामन्यात चांगली कामगिरी केली. पहिल्या डावात भारताने 720 रन्स केले. त्यामुळे टीम इंडियाला 352 रन्सची आघाडी मिळाली होती. तरीही सामना ड्रॉ राहिला. दरम्यान या निकालाचा फटका न्यूझीलंडलाही बसला आहे. WTC 2025-27 च्या पॉईंट्स टेबलमध्ये न्यूझीलंडची टीम दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरलीये. तर भारतीय टीम चौथ्या क्रमांकावर कायम आहे. पण भारताची पीसीटी म्हणजेच पॉईंट्सची टक्केवारी कमी झालीये.

भारताला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी काय करावं लागेल?

भारतासाठी न्यूझीलंडविरुद्ध क्राइस्टचर्चमध्ये होणारी पुढची टेस्ट मॅच अत्यंत महत्त्वाची असणार आहे. जर न्यूझीलंडने हा सामना जिंकला तर टीम इंडियाच्या अडचणी वाढू शकतात. कारण त्यानंतर न्यूझीलंडची टीम 9 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियाच्या घरच्या मैदानावर चार सामन्यांची टेस्ट सिरीज खेळणार आहे.

World Test Championship 2025-27
Shubman Gill: पहिल्याच टेस्टमध्ये ड्रामा; अंपायरच्या निर्णयाने शुभमन गिलचा पारा चढला! नेमकं काय घडलं?

अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाला न्यूझीलंडविरुद्धचे चारही सामने जिंकावे लागतील. तर टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या सिरीजमध्ये 5-0 असा क्लीन स्वीप करावा लागेल. असं झाल्यासच भारताला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही टीम्सना मागे टाकता येईल. भारताने ही सिरीज 4-0 किंवा 4-1 अशी जिंकली, तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीत पोहोचण्याचे गणित पूर्णपणे त्याच्या हातात राहणार नाही.

World Test Championship 2025-27
India vs New Zealand: वेलिंग्टन टेस्टमध्ये भारताच्या विजयाचं स्वप्न भंगलं! मिचेल-फिलिप्सची संयमी फलंदाजी, सामना अनिर्णित

याशिवाय भारताने क्राइस्टचर्च टेस्ट जिंकली आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला 4-0 ने पराभूत केलं तर टीम इंडियासाठी अंतिम फेरीचा मार्ग काहीसा सोपा होऊ शकतो. अशा परिस्थितीत भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धची सिरीज 5-0 किंवा 4-0 अशी जिंकावी लागणार आहे. पण टीम इंडियाने ही सिरीज 4-1 अशी जिंकली तर पॉईंट्सच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया भारताच्या पुढे जाऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.