Shubman Gill: पहिल्याच टेस्टमध्ये ड्रामा; अंपायरच्या निर्णयाने शुभमन गिलचा पारा चढला! नेमकं काय घडलं?

IND vs NZ Test Series: भारत विरुद्ध न्यूझीलंड वेलिंग्टन टेस्टमध्ये ग्लेन फिलिप्सविरोधातील एलबीडब्ल्यू अपील फेटाळल्यानंतर शुभमन गिल अंपायरच्या निर्णयावर नाराज झाला. डीआरएसमध्ये स्निकोमीटरवर स्पाइक दिसल्याने वाद निर्माण झाला. पहिल्या दिवसअखेर न्यूझीलंडने 243 धावा केल्या असून हेन्री निकोल्सने शतक झळकावलं.
Shubman Gill
Shubman Gillsaam tv
Published On: 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जातेय. या सिरीजमधील पहिला सामना वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह मैदानावर सुरू आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी मैदानावरचं वातावरण थोडं तापलेलं दिसलं. न्यूझीलंडचा फलंदाज ग्लेन फिलिप्स याच्याविरोधात भारताने एलबीडब्ल्यूची अपील केली होती. पण मैदानावरील अंपायरने फिलिप्सला नाबाद ठरवलं.

दरम्यान अंपायरच्या या निर्णयावर टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल काहीसा संतपालेला दिसला. त्याने अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ यांच्याकडे या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली. ही घटना न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील 31 व्या ओव्हरमध्ये घडली. जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत होता. त्याच्या ओव्हरमधील तिसरा चेंडू वेगाने आत आला. हा चेंडू ग्लेन फिलिप्सच्या बॅटवर न लागता थेट पॅडवर लागला. यानंतर भारतीय खेळाडूंनी एलबीडब्ल्यूचं अपील . पण अंपायरने फिलिप्सला नाबाद ठरवलं.

Shubman Gill
Jasprit Bumrah bowling: बुमराहच्या 'मास्टरक्लास' चेंडूवर टॉम लॅथम चक्रावला, बॉल सोडला अन् थेट क्लिन बोल्ड, पाहा Video

यानंतर शुभमन गिलने विकेटकीपर आणि बुमराहसोबत चर्चा केली. त्यानंतर त्याने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. पण रिव्ह्यू घेण्यापूर्वी बुमराहला चेंडूची उंची जास्त असल्याचं वाटत होतं. त्याने गिलला 'हाइट है' असं सांगितलं. दुसरीकडे गिल चेंडू बॅटला लागला नसल्यावर ठाम होतं. त्यावर त्याने 'बैट नहीं है' असं उत्तर दिलं.

रिव्ह्यूमध्ये स्निकोमीटरवर चेंडू बॅटच्या जवळून जाताना मोठा स्पाइक दिसला. पण समोरून दाखवलेल्या व्हिडिओमध्ये बॅटला चेंडू लागल्याचं स्पष्ट दिसत नव्हतं. त्यामुळे थर्ड अंपायर पॉल राइफल यांनी अनेक वेळा रिप्ले पाहिले. त्यानंतर चेंडू बॅटला हलकासा लागल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला. त्यामुळे मैदानावरील अंपायरचा नाबाद देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला.

गिल अंपायरच्या निर्णयावर नाराज

थर्ड अंपायरचा निर्णय आल्यानंतर शुभमन गिलने मैदानी अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ यांच्याशी चर्चा केली. गिलच्या मते, बॅट आणि पॅड यांच्यामध्ये स्पष्ट अंतर दिसून येत होतं. शिवाय चेंडू आधी पॅडला लागला होता. त्यामुळे त्याने अंपायरसमोर आपली बाजू मांडली.

Shubman Gill
Young Cricketer Death: टीम इंडियाच्या खेळाडूने संपवलं आयुष्य; क्रिकेट विश्वात खळबळ

अंपायरनेही गिलला निर्णयामागचं कारण समजावून सांगितलं. पण गिलने नाराजीने मान हलवली आणि तिथून निघून गेला. जसप्रीत बुमराहही या निर्णयावर खूश दिसत नव्हता. पण रिप्लेमध्ये चेंडू स्टम्पच्या वरून जात असल्याचं दिसत होतं. त्यामुळे चेंडू बॅटला लागला नसता तरीही फिलिप्सला एलबीडब्ल्यू देण्याची शक्यता कमी होती.

भारताने पहिल्याच सेशनमध्ये घेतले चार विकेट

या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पहिल्याच ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमला बाद केलं. लॅथमला भोपळाही फोडता आला नाही. पहिल्या सेशनमध्ये बुमराहने दोन विकेट्स घेतल्या. तर अंशुल कम्बोज आणि आकाश दीप यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

Shubman Gill
Team India: रोहित-विराटचा न्यूझीलंडमधील शेवटचा वनडे सामना; चाहत्यांचे आभार मानताना दिग्गज भावूक, पाहा Video

पहिल्या दिवसाचा खेळ संपला

वेलिंग्टन टेस्टच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपलाय. दिवसअखेर न्यूझीलंडने 82 ओव्हर्समध्ये 5 विकेट गमावत 243 रन्स केलेत. तिसऱ्या सेशनमध्ये न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला भारताला बाद करता आलं नाही. हेन्री निकोल्स 113 रन्सवर तर ग्लेन फिलिप्स 94 धावांवर खेळतोय. या दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी 173 रन्सची पार्टनरशिप झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.