

न्यूझीलंड दौऱ्यावर टीम इंडियाने वनडे सिरीजवर आपलं नाव कोरलं. टी-20 सिरीजनंतर भारताने वनडे सिरीजही आपल्या नावावर केलीये. पाच सामन्यांची टी-20 सिरीज भारताने 3-2 ने जिंकली होती. त्यानंतर आता वनडे सिरीजमध्येही भारताने 3-1 ने विजय मिळवला आहे.
रविवारी माउंट माउंगानुईच्या बे ओव्हल मैदानावर पाचवा वनडे सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय टीमने न्यूझीलंडचा 22 रन्सने पराभव केला. मात्र यावेळी चर्चा रंगली ती रोहित शर्मा आणि विराट कोहलीचीय रोहित आणि विराट यांचा न्यूझीलंडमधील हा शेवटचा सामना होता. सामना संपल्यानंतर दोघांनीही चाहत्यांचे आभार मानले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन्ही दिग्गज फलंदाज शेवटच्या वेळी न्यूझीलंड दौऱ्यावर आले होते. या दोघांनीही टी-20 आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीये. त्यामुळे आता ते फक्त वनडे क्रिकेट खेळतात. न्यूझीलंडमधील हा त्यांचा शेवटचा दौरा होता. आपल्या शेवटच्या वनडे सामन्यात मात्र दोघांनाही मोठी खेळी करता आली नाही. रोहित शर्मा 13 चेंडूंमध्ये 7 रन्स करून बाद झाला. तर विराट कोहलीला 7 चेंडूंमध्ये केवळ 5 रन्स करता आल्या. दोघांची खेळी लवकर संपली असली तरी त्यांना मैदानावर खेळताना पाहण्यासाठी हजारो चाहते स्टेडियममध्ये आले होते.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या न्यूझीलंडमधील शेवटच्या सामन्यानंतर आता त्यांच्या पुढील क्रिकेट कारकिर्दीबाबत चर्चा सुरू झालीये. दोन्ही खेळाडू सध्या फक्त वनडे क्रिकेट खेळत असल्याने आगामी वर्ल्डकपमध्ये ते टीम इंडियाचा भाग असणार का असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. हे दोघं वर्ल्डकप खेळणार की नाही याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
पाचव्या वनडे सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी फारशी चांगली झाली नाही. टीम इंडिया अवघ्या 209 रन्सवर सर्वबाद झाली. त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी 210 रन्सचं लक्ष्य मिळालं. सुरुवातीला हा सामना न्यूझीलंड सहज जिंकेल असं वाटत होतं. पण भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत सामन्याचं चित्रच बदललं.
भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना जास्त वेळ मैदानावर टिकू दिलं नाही. संपूर्ण न्यूझीलंडची टीम 187 रन्सवर बाद झाली. त्यामुळे भारताने हा सामना 22 रन्सने जिंकला. या विजयासह पाच सामन्यांची वनडे सिरीज टीम इंडियाने 3-1 ने जिंकली.
भारताने तब्बल 7 वर्षांनंतर न्यूझीलंडमध्ये वनडे सिरीज जिंकलीये. न्यूझीलंडच्या टीमलाही आपल्या घरच्या मैदानावर सात वर्षांनंतर वनडे सिरीज गमवावी लागलीये. भारताच्या या विजयात अर्शदीप सिंह आणि मोहम्मद सिराज यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अर्शदीपने तीन विकेट घेतल्या, तर मोहम्मद सिराजने दोन फलंदाजांना बाद केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.