.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
जय शाह यांची आयसीसी (ICC) अध्यक्षपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. बाली येथे झालेल्या आयसीसी बोर्ड आणि कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, आयसीसीने याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जय शाह यांचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. आजी-माजी खेळाडूंनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.
आयसीसीचा दुसऱ्यांदा कार्यभार स्वीकारल्यानंतर जय शाह म्हणाले की, "आयसीसी बोर्डाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे. खेळाचा जागतिक विस्तार, चाहत्यांची वाढ आणि व्यावसायिक विकास यावर आमचा भर असेल. LA28 ऑलिम्पिकमधील क्रिकेटचे पुनरागमन ही नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची आणि नवीन पिढीला प्रेरित करण्याची एक सुवर्णसंधी आहे."
पहिल्या टर्ममधील कामाची दखल घेऊन बोर्डाने जय शाह यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे क्रिकेटच्या जागतिक प्रसाराला आणखी गती मिळण्याची अपेक्षा आहे.
२०२४ मध्ये पहिल्यांदा जय शाह यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. बाली येथे झालेल्या बैठकीत शाह यांची अध्यक्षपदी एकमताने पुन्हा निवड झाली होती. २०२४ मध्ये जय शाह यांनी ग्रेग बार्कले यांची जागा घेतली होती . त्यावेळी त्यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. आयसीसीने सोमवारी एक निवेदन जारी करत जय शाह यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती दिली.
आयसीसी अध्यक्ष म्हणून पुन्हा नियुक्ती झाल्यानंतर जय शाह यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, आयसीसी बोर्डाने सलग दुसऱ्यांदा माझ्यावर विश्वास दाखवला आहे, ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी सर्व संचालकांचे त्यांच्या विश्वासासाठी आणि पाठिंब्याबद्दल आभार मानतो.
जय शाह पुढे म्हणाले, आयसीसी अध्यक्ष म्हणून काम करणे ही एक मोठी जबाबदारी आणि सन्मान दोन्ही आहे. जगभरातील क्रिकेटचे हित साधण्यासाठी सर्व सदस्यांसोबत मिळून काम करण्यास मी वचनबद्ध आहे. ऑलिम्पिकवर विशेष लक्ष२०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट पुनरागमन करत आहे. १२८ वर्षांनंतर क्रिकेट या भव्य स्पर्धेत परत येत आहे.
क्रिकेटसाठी ही एक निर्णायक वेळ आहे. २०२८ चे ऑलिम्पिक जागतिक स्तरावर आपली छाप सोडण्याची एक सुवर्णसंधी आहे. ऑलिम्पिक क्रिकेटच्या खेळाला नव्या उंचीवर घेऊन जाईल आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवेल, असा विश्वास जय शाह यांनी व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.