Suryakumar Yadav Viral Video: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि माजी टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या आपल्या फलंदाजीसोबतच एका खास व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. २०२६ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबई संघाचे नेतृत्व करणाऱ्या सूर्यकुमारने हैदराबादविरुद्ध पहिल्याच सामन्यात तुफानी फलंदाजी केली. दरम्यान, सामन्यानंतरचा त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार यादव भारतीय क्रिकेटपटू सरफराज खान आणि मुंबई संघातील इतर खेळाडूंसोबत मटणाच्या मेजवानीचा आनंद घेताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार यादव जमिनीवर बसून मटणाचा आस्वाद घेताना दिसत आहे. त्याच्यासोबत सरफराज खान आणि मुंबई संघातील काही खेळाडूही उपस्थित आहेत. स्वयंपाकघरात बसून मटण खाताना दिसत आहेत. खेळाडूंचा हा साधा आणि घरगुती अंदाज चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार एका व्यक्तीची ओळख करून देताना म्हणतो, "हा माणिक भाई आहे. त्याने आमच्यासाठी हे मटण बनवले आहे." यानंतर तो हे वातावरण अगदी घरगुती असल्याचे सांगतो. क्रिकेटच्या मैदानावर आपल्या आक्रमक फलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडणारा सूर्यकुमार मैदानाबाहेर मात्र मित्रांसोबत निवांत क्षणांचा आनंद घेताना दिसत आहे.
२०२६ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईचा पहिला सामना हैदराबादविरुद्ध झाला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने अवघ्या २१ चेंडूंत नाबाद ६० धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ६ चौकार आणि ५ षटकार लगावले. विशेष म्हणजे, त्याचा स्ट्राइक रेट २८५.७१ इतका होता. सूर्यकुमारच्या या आक्रमक फलंदाजीमुळे मुंबईला विजय मिळवणे सोपे झाले. त्याला मुशीर खाननेही उत्तम साथ दिली. मुशीरने अवघ्या २४ चेंडूंत ५१ धावा केल्या. त्याने ६ चौकार आणि ३ षटकारांचा मारले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादचा संघ २० षटकांत १७२ धावांवर सर्वबाद झाला. अबिरथ रेड्डीने सर्वाधिक ३५ धावा केल्या. मुंबईकडून मॅक्सवेल स्वामीनाथनने गोलंदाजी करत ३ विकेट घेतले. १७३ धावांच्या टार्गेटसाठी मुंबईने अवघ्या १३.१ षटकांत ३ गडी गमावून विजय मिळवला. सूर्यकुमार आणि मुशीर खान यांनी तिसऱ्या विकेटसाठी केवळ २३ चेंडूंत ६५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. अशा प्रकारे मुंबईने विजय मिळवला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.