

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्ट सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने असा काही कॅच पकडला, की मैदानावरील खेळाडूंसोबतच कॉमेंट्री बॉक्समधील दिग्गजही थक्क झाले. गॉल टेस्टच्या तिसऱ्या दिवशी गिलने कामिंदु मेंडिसचा घेतलेला हा कॅच सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा पहिला डाव ४६२ रन्सवर संपला. त्यानंतर श्रीलंकेची टीम फलंदाजीसाठी मैदानात उतरली. भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना फार काळ मैदानावर टिकू दिलं नाही. एका ठराविक अंतराने श्रीलंकेचे विकेट्स पडत गेले. याचदरम्यान तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सेशनमध्ये शुभमन गिलने अफलातून झेल घेत कामिंदु मेंडिसला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
ही घटना श्रीलंकेच्या डावातील १७व्या ओव्हरमध्ये घडली. कुलदीप यादव गोलंदाजी करत होता आणि कामिंदु मेंडिस त्याच्यासमोर फलंदाजी करत होता. कुलदीपच्या बॉलवर मेंडिसने कव्हर्सच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवर उभ्या असलेल्या शुभमन गिलने क्षणाचाही विलंब न करता आपल्या डाव्या बाजूला उडी घेतली आणि एका हाताने अप्रतिम कॅच पकडला.
गिलने घेतलेला हा कॅच इतका वेगाने घेतला की, कामिंदु मेंडिसलाही नेमकं काय घडलं हे काही क्षण समजलं नाही. गिलने हवेत झेप घेत एका हाताने चेंडू पकडला आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
कॅच पकडल्यानंतर गिलने त्याच उत्साहात जोरदार सेलिब्रेशनही केलं. या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सर्वजण गिलच्या जबरदस्त फील्डिंगचं कौतुक करत आहेत. गिलने हा झेल घेतला त्यावेळी श्रीलंकेच्या टीमची अवस्था ४ बाद ५९ रन्स अशी होती. त्याआधी भारताने आपल्या पहिल्या डावात ४६२ रन्सचा मोठा स्कोअर उभारला होता.
गिलच्या या कॅचचं कॉमेंट्री करताना भारताचा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनाही त्याचं कौतुक करण्यापासून स्वतःला रोखता आलं नाही. त्यांच्या मते, चेंडू गिलपासून बराच लांब होता. तरीही गिलने पूर्ण प्रयत्न लावून स्वतःला स्ट्रेच केलं आणि हा अवघड कॅच यशस्वीपणे पकडला. गिलच्या कारकिर्दीतील हा नक्कीच सर्वात शानदार कॅचपैकी एक असल्याचं मांजरेकर यांनी म्हटलं.
स्पोर्ट्स कॉमेंटेटर आणि प्रेझेंटर इयान बिशप यांनाही गिलचा हा झेल पाहून आश्चर्य वाटलं. त्यांनीही टीम इंडियाच्या कर्णधाराचं या फील्डिंगचं भरभरून कौतुक केलं. हा कॅच खरोखरच जबरदस्त असल्याचं त्यांनी म्हटलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.