IND vs SL: ६०० व्या टेस्टमध्ये भारतासमोर श्रीलंकेचं आव्हान; शुभमन गिलने नाणेफेक जिंकली, प्लेईंग ११ मध्ये कुणाला मिळाली संधी?

India Sri Lanka Test: भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या टेस्टला गॉलमध्ये सुरुवात झाली. भारताचा हा ऐतिहासिक 600वा टेस्ट सामना आहे. शुभमन गिलने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडली. WTC 2025-27च्या दृष्टीनेही या सामन्याला विशेष महत्त्व आहे.
IND vs SL
IND vs SLsaam tv
Published On

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या टेस्ट सिरीजला आजपासून सुरुवात झाली आहे. मुख्य म्हणजे टीम इंडियाचा हा ६०० वा टेस्ट सामना आहे. सिरीजमधील पहिला सामना गॉलमधील गॉल इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जातोय. या सामन्यात भारतीय टीमचा कर्णधार शुभमन गिलने टॉस जिंकला असून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.

श्रीलंकेच्या फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांची चांगलीच कसोटी लागणार आहे. गॉलची परिस्थिती लक्षात घेता श्रीलंकेचे स्पिनर गोलंदाज भारतासाठी आव्हान ठरू शकतात. त्यामुळे शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय टीमसमोर या सामन्यात मोठी परीक्षा असणार आहे.

IND vs SL
Jonty Rhodes: वनडे क्रिकेटच्या भविष्याबाबत जॉन्टी र्‍होड्स यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 50 षटकांचं क्रिकेट...

ही टेस्ट सिरीज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2025-27 च्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. भारतीय टीम सध्या WTC पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या सिरीजमध्ये चांगली कामगिरी करून पॉईंट्स टेबलमध्ये वरच्या स्थानावर जाण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असणार आहे.

भारताचं श्रीलंकेवर वर्चस्व

भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 46 टेस्ट सामने खेळले गेलेत. त्यापैकी भारताने 22 सामने जिंकले आहेत तर श्रीलंकेने 7 सामन्यांत विजय मिळवला आहे. 17 सामने अनिर्णित राहिलेत. गेल्या 10 कसोटी सामन्यांचा विचार केला, तर भारताने श्रीलंकेविरुद्ध 8 सामने जिंकले आहेत, तर दोन सामने अनिर्णित राहिले. श्रीलंकेला भारताविरुद्ध शेवटचा कसोटी विजय 2015 मध्ये गॉलमध्येच मिळाला होता. त्यामुळे टेस्ट क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताचे पारडे आतापर्यंत चांगलेच जड राहिले आहे.

IND vs SL
Ind vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या कसोटीसाठी संघाची घोषणा, या खेळाडूंना मिळाली संधी

भारत विरुद्ध श्रीलंका- हेड टू हेड

  • एकूण टेस्ट सामने : 46

  • भारताचा विजय : 22

  • श्रीलंकेचा विजय : 7

  • अनिर्णित सामने : 17

भारताची प्लेइंग-11

यशस्वी जैयस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मानव सुथार, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

IND vs SL
Sri Lanka cricket: श्रीलंकेत क्रिकेट कोचच्या हत्येने खळबळ; खेळाडूंसोबत भांडणानंतर नेमकं काय घडलं? क्रिकेटपटू अटकेत

श्रीलंकेची संभाव्य प्लेइंग-11

निशान मदुष्का, लाहिरू उदारा, दिनेश चांदीमल, कामिंदु मेंडिस, धनंजय डी सिल्वा (कर्णधार), निरोशन डिकवेला (विकेटकीपर), सोनल दिनुषा, केशरा नुवांथा, प्रभात जयसूर्या, लाहिरू कुमारा आणि असिथा फर्नांडो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com