

भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होत आहे. पहिला कसोटी सामना १५ ऑगस्टपासून गॉल येथे सुरू होईल. या पहिल्या कसोटीसाठी श्रीलंकेकडून संघाची घोषणा केली आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत श्रीलंका संघ कुणाला मैदानात उतरवणार याबाबत कमालीची उत्सुकता होती. अखेर कसोटी सामन्याला सुरुवात होण्याची तीन दिवस आधी खेळाडूंची नावं समोर आली आहेत. दुसरीकडे टीम इंडिया गॉलमध्ये पोहचली असून, तयारीही सुरू केली आहे. तर श्रीलंकेनं भारताविरुद्धच्या श्रीलंका संघाची धुरा धनंजय डिसिल्व्हाकडे दिली आहे.
श्रीलंकेकडून भारताविरुद्धच्या कसोटीसाठी संघ जाहीर करण्यात आला आहे. या मालिकेत दोन सामने होतील, पण सध्या फक्त पहिल्या कसोटीसाठीच संघ घोषित केला आहे. श्रीलंकेच्या संघातील अनेक खेळाडूंना दुखापतीनं ग्रासलं होतं. त्यामुळं संघ घोषित करण्यास विलंब झाल्याचं सांगण्यात येत होतं. श्रीलंकेचे कर्णधारपद धनंजय डिसिल्व्हाकडे सोपवण्यात आले आहे. कामिंदू मेंडिसकडं उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. प्रभात जयसूर्यालाही संघात स्थान दिलंय. त्याच्या फिरकीचं आव्हान भारतीय फलंदाजांसमोर असेल.
श्रीलंकाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा आधीच झाली होती. त्यानंतर दोन बदल करण्यात आले होते. जसप्रीत बुमराह आणि साई सुदर्शन मालिकेत खेळू शकणार नाहीत. त्यांच्या जागी अकिब नबी आणि सरफराज खान यांना संधी दिली गेली. १५ ऑगस्टपासून दोन्ही संघ आमनेसामने असतील. सराव सामना जिंकला असला तरी श्रीलंकेच्या भूमीत भारतीय फलंदाजांचा कस लागणार आहे.
धनंजय डीसिल्व्हा (कर्णधार), कामिंदू मेंडिस (उपकर्णधार), दिनेश चंडीमल, पासिंदू सोरियाबंदरा, लाहिरू उदारा, निशान मदुश्का, सोनल दिनुषा, निरोशन डिकवेला, रमेश मेंडिस, प्रभात जयसूर्या, केशरा नुवांथा, मिलन रथनायके, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा, विश्व फर्नांडो, दिलशान मदुश्का.
भारतीय संघ पुढीलप्रमाणे -
शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन, अकिब नबी, सरफराज खान.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.