IND vs SL : टीम इंडियाची श्रीलंका दौऱ्यासाठी निवड; कुणाला मिळाली संधी? कुणाचा पत्ता कट?

India vs Sri Lanka Test Series : बीसीसीआयने श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. पहिल्या कसोटीसाठी वॉशिंग्टन सुंदर उपलब्ध नसल्याची माहितीही देण्यात आली आहे.
India vs Sri Lanka, India Test Squad
India vs Sri Lanka, India Test Squad
Published On

India vs Sri Lanka, India Test Squad : श्रीलंकेविरोधात होणाऱ्या २ कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यात २ कसोटी सामने खेळणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर उपलब्ध नसेल अशी माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी देवदत्त पड्डीकल आणि सरांश जैन या दोन युवा खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. (BCCI Squad Announcement, Shubman Gill Captain,)

१५ ऑगस्टपासून भारतीय संघ श्रीलंकाविरोधात २ कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा समतोल साधण्यात आला आहे. ध्रुव जुरेल आणि ऋषभ पंत यांना विकेटकीपर म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. तर केएल राहुल याच्याकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आह.

India vs Sri Lanka, India Test Squad
इकडे कच्चे तेल धडाम, तिकडे पेट्रोल डिझेलचे आजचे दर जाहीर; जाणून घ्या ग्राहकांना दिलासा मिळाला का?

श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ निवडला आहे. या मालिकेपूर्वी टीम इंडिया ७ ऑगस्टपासून कोलंबो येथे चार दिवसीय सराव सामना खेळणार आहे. साई सुदर्शन आणि जसप्रीत बुमराह यांची उपलब्धता बीसीसीआय सीओईकडून मिळणाऱ्या फिटनेस मंजुरीवर अवलंबून असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तर पहिल्या सामन्यासाठी वॉशिंग्टन सुंदर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आलेय.

India vs Sri Lanka, India Test Squad
Pune : मुलीच्या पोटात दुखू लागल्याने उघडकीस आला भयंकर प्रकार! ६० वर्षांच्या नराधमाचे सख्ख्या बहिणींवर अत्याचार

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीसाठी भारताचा संघ:

शुभमन गिल [कर्णधार], केएल राहुल [उपकर्णधार], यशस्वी जायस्वाल, ऋषभ पंत [विकेटकीपर], साई सुदर्शन*, ध्रुव जुरेल [विकेटकीपर], रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुतार, जसप्रीत बुमराह*, सिराज,प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सरांश जैन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com