इकडे कच्चे तेल धडाम, तिकडे पेट्रोल डिझेलचे आजचे दर जाहीर; जाणून घ्या ग्राहकांना दिलासा मिळाला का?

Petrol Price Today, Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली असली तरी भारतातील पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि सीएनजीच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही
Petrol Diesel Fresh Prices
Petrol Diesel Fresh Prices
Published On

Petrol, Diesel, LPG, CNG Rates: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली असतानाच, देशांतर्गत इंधन कंपन्यांनी पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि सीएनजीचे नवे दर जाहीर केले आहेत. कच्च्या तेलाचे भाव घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा होती; मात्र, भारतीय तेल कंपन्यांनी आजच्या दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीचा थेट फायदा भारतीय ग्राहकांना कधी मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे

सोमवारी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली होती. हाच ट्रेंड आजही पाहायला मिळाला. मंगळवारी बाजार उघडताच कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घसरण नोंदवण्यात आली. ब्लूमबर्गच्या रिपोर्ट्सनुसार आज सकाळी ब्रेंट क्रूडचा (कच्चे तेल) भाव प्रति बॅरल ८७.७६ डॉलर आणि डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव प्रति बॅरल ८१.७६ डॉलर होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव घसरत असतानाच भारतातील पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

Petrol Diesel Fresh Prices
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथा आणि विदर्भाला ‘येलो अलर्ट’

पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर

भारतात आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही . दिल्लीत पेट्रोलचा दर अजूनही १०२.१२ रुपये आणि डिझेलचा दर ९५.२० रुपये प्रति लिटर आहे. मुंबई, पुण्यापासून दिल्ली आणि लखनौमध्ये पेट्रोलच्या दर जैसे थे राहिलेत. लखनौमध्ये पेट्रोलचा दर १०२.०५ रुपये आणि डिझेलचा दर ९९.२८ रुपये आहे. भोपाळमध्ये पेट्रोलचा दर ११४.६५ रुपये आणि डिझेलचा दर ९९.७४ रुपये आणि इंदूरमध्ये पेट्रोलचा दर ११४.६१ रुपये आणि डिझेलचा दर ९९.७० रुपये प्रति लिटर आहे.

Petrol Diesel Fresh Prices
राजकीय घडामोडींना वेग; ६ दिवसांत सुप्रिया सुळेंची मोदी-शहांसोबत दुसरी भेट, नेमकं कारण काय?

एलपीजी सिलेंडरचे दर

आज भारतात घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. इंडियन ऑइलच्या माहितीनुसार, दिल्लीत १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत ₹९४२ असून, १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत ₹२९३० आहे.

पाटणामध्ये घरगुती सिलेंडरची किंमत ₹1031.50 आणि व्यावसायिक सिलेंडरची किंमत ₹3227 आहे. लखनौमध्ये घरगुती सिलेंडरची किंमत ₹979.50 आणि व्यावसायिक सिलेंडरची किंमत ₹3052.50 आहे.

७ मार्च रोजी घरगुती सिलेंडर ६० रुपयांनी महाग झाला. दिल्लीत त्याची किंमत ८५३ रुपयांवरून ९१३ रुपयांपर्यंत वाढली. ७ जून रोजी त्यात आणखी २९ रुपयांची वाढ झाली. या वर्षात आतापर्यंत घरगुती एलपीजी सिलेंडर ८९ रुपयांनी महाग झालाय.

सीएनजीच्या दरातही कोणताही बदल झालेला नाही. मुंबई, पुणे, दिल्लीपासून ते राजस्थान, कोलकातामध्ये दर जैसे थे राहिलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com