Pune : मुलीच्या पोटात दुखू लागल्याने उघडकीस आला भयंकर प्रकार! ६० वर्षांच्या नराधमाचे सख्ख्या बहिणींवर अत्याचार

Wakad POCSO case latest news : पुण्यातील वाकड परिसरात दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींवरील कथित लैंगिक अत्याचारप्रकरणी ६१ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध पोक्सो, भारतीय न्याय संहिता (BNS) आणि ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
Police presence during investigation of a POCSO case in Wakad, Pune.
Police investigate a POCSO case in Pune's Wakad area.Saam
Published On

गोपाल मोटघरे, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

Pune Crime, Wakad POCSO Case : पुण्यातील पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ६१ वर्षांच्या नराधमाने १० आणि ५ वर्षांच्या दोन सख्ख्या बहिणींवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक बाब उघडकीस आली आहे. पीडित मुलींपैकी एका मुलीच्या पोटात वारंवार दुखू लागल्याने, तिच्या पालकांनी चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.

या घटनेची माहिती मिळताच पीडित मुलींचे नातेवाईक आणि संतप्त नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी वाकड पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून संशयित नराधमाला तातडीने ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पॉक्सो) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

ताथवडे परिसरात एका ६१ वर्षीय वृद्धाने दोन अल्पवयीन बालकांवर लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पॉक्सो - POCSO) कायदा आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Police presence during investigation of a POCSO case in Wakad, Pune.
राजकीय घडामोडींना वेग; ६ दिवसांत सुप्रिया सुळेंची मोदी-शहांसोबत दुसरी भेट, नेमकं कारण काय?

नेमकी घटना काय?

पोलीस माहितीनुसार, मे २०२६ ते २७ जुलै २०२६ या कालावधीत ताथवडे येथील एका राहत्या घरी ही घटना घडली. आरोपीने १० वर्षांच्या चिमुकलीला तिचे तोंड दाबून बळजबरीने स्वतःच्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. तसेच तिच्या लहान बहिणीलाही बळजबरीने घरात नेल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची माहिती पालकांना मिळताच त्यांनी तात्काळ वाकड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

Police presence during investigation of a POCSO case in Wakad, Pune.
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथा आणि विदर्भाला ‘येलो अलर्ट’

आरोपीविरुद्ध कठोर कायदेशीर कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ६१ वर्षीय आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यातील विविध कलमे, भारतीय न्याय संहितेतील कलम ६४(२), ६५(२), ७४, ७६, ३५१(३) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी) कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे.

Police presence during investigation of a POCSO case in Wakad, Pune.
इकडे कच्चे तेल धडाम, तिकडे पेट्रोल डिझेलचे आजचे दर जाहीर; जाणून घ्या ग्राहकांना दिलासा मिळाला का?

वरिष्ठ पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. यामध्ये पोलीस उपआयुक्त प्रदीप जाधव, साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे आणि पोलीस उपनिरीक्षक स्वाती घुगे यांनी तपासचक्रे वेगाने फिरवली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com