Jonty Rhodes: वनडे क्रिकेटच्या भविष्याबाबत जॉन्टी र्‍होड्स यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 50 षटकांचं क्रिकेट...

ODI cricket future: टी-२० लीगच्या वाढत्या प्रभावामुळे भविष्यात वनडे मालिकांची संख्या कमी होऊ शकते, मात्र ५० षटकांचं क्रिकेट संपणार नाही, असं जॉन्टी र्‍होड्स यांनी म्हटलं. मुंबईत रॉटरडॅम डॉकर्सच्या जर्सी लॉन्चवेळी त्यांनी ETPL आणि युरोपातील क्रिकेटच्या भविष्याबाबतही आपलं मत व्यक्त केलं.
Jonty Rhodes
Jonty Rhodessaam tv
Published On

जगभरात टी-२० लीग आणि फ्रँचायझी क्रिकेटचा जोर वाढतोय. त्यामुळे भविष्यात दोन देशांमधील वनडे मालिकांची संख्या कमी होऊ शकते. मात्र, ५० षटकांचं क्रिकेट पूर्णपणे संपेल असं वाटत नाही, असं दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू आणि रॉटरडॅम डॉकर्सचा सहमालक जॉन्टी र्‍होड्स यांनी म्हटलंय. युरोपियन टी-२० प्रीमियर लीगच्या (ETPL) पहिल्या सिझनसाठी रॉटरडॅम डॉकर्सच्या जर्सीचं मंगळवारी मुंबईत अनावरण करण्यात आलं.

यावेळी रॉटरडॅम डॉकर्सचे सहमालक जॉन्टी र्‍होड्स आणि अभिनेता जॉन अब्राहम, संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक मधुकर श्री तसंच Fireflies.ai चे सहसंस्थापक आणि सीईओ कृष्ण रामिनेनी उपस्थित होते.

Jonty Rhodes
Yash Dhull: भर मैदानात IPL स्टार खेळाडूंनी पडकली एकमेकांची कॉलर; Video व्हायरल, पाहा नेमकं काय घडलं?

जर्सीच्या अनावरणानंतर माध्यमांशी बोलताना र्‍होड्सने क्रिकेटच्या भवितव्यावर आपलं मत मांडलं. ते म्हणाले, ‘‘टी-२० क्रिकेट सुरू झालं तेव्हा त्याचा टेस्ट क्रिकेटवर परिणाम होईल, असं म्हटलं जात होतं. पण तसं काही झालं नाही. उलट आता काही टेस्ट सामन्यांमध्येही टी-२०सारखा आक्रमक खेळ पाहायला मिळतो. वनडे क्रिकेटसमोर मात्र काही आव्हानं आहेत. वनडे पाहण्यासाठी नव्या प्रेक्षकांना जोडावं लागेल. त्यामुळे भविष्यात दोन देशांमधील वनडे सिरीज संख्या कमी होऊ शकते. पण ५० षटकांचे क्रिकेट नसलं तर क्रिकेटची कल्पना करणंही कठीण आहे.’’

२६ ऑगस्टला पहिला सामना

युरोपातील क्रिकेटला नवा प्लॅटफॉर्म मिळवून देण्यासाठी ETPLची सुरुवात होतेय. लीगच्या पहिल्या सिझनची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. रॉटरडॅम डॉकर्सचा पहिला सामना २६ ऑगस्टला व्हूरबर्गमध्ये अॅमस्टरडॅम फ्लेम्सविरुद्ध होणार आहे. या टीममची मालकी जॉन्टी र्‍होड्स, जॉन अब्राहम आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस यांच्याकडे आहे. डू प्लेसिस टीमचं नेतृत्व करणार आहे.

रॉटरडॅम डॉकर्समध्ये टी-२० क्रिकेटमधील अनेक मोठी नावे आहेत. हेन्रिक क्लासेन, अॅनरिख नॉर्त्झे, लोगान व्हॅन बीक आणि रोएलॉफ व्हॅन डर मर्व्हे यांच्यासह नेदरलँड्सच्या काही युवा खेळाडूंनाही टीममध्ये संधी देण्यात आलीये. त्यामुळे टीममध्ये अनुभवी आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि स्थानिक युवा खेळाडूंचा चांगला मेळ पाहायला मिळणार आहे.

‘युरोपातील क्रिकेटसाठी मोठी संधी’

र्‍होड्स म्हणाले, ‘‘रॉटरडॅम हे युरोपचं महत्त्वाचं शहर आहे. युरोपातील क्रिकेटसाठी रॉटरडॅम डॉकर्सला चांगले काम करण्याची मोठी संधी आहे. नेदरलँड्ससह युरोपमध्ये अनेक चांगले युवा खेळाडू आहेत. त्यांना पुढे येण्यासाठी ETPL चांगले व्यासपीठ ठरू शकतं. आम्हाला पहिल्या सिझनासूनच विजेतेपदासाठी खेळायचं आहे. पण त्याचबरोबर युरोपातील क्रिकेटला पुढे नेण्यासाठी दीर्घकाळ काम करणं हे आमचं मोठं लक्ष्य आहे.’’

जॉन अब्राहमलाही मोठ्या अपेक्षा

जॉन अब्राहमनेही ETPLमुळे युरोपातील क्रिकेटला मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. तो म्हणाला, ‘‘खेळ हा माझ्या आयुष्याचा नेहमीच महत्त्वाचा भाग राहिलाय. युरोपातील क्रिकेटच्या वाढीसाठी ही चांगली संधी आहे. विशेषतः नेदरलँड्स, आयर्लंड आणि स्कॉटलंडमधील युवा खेळाडूंना पुढे आणण्यावर भर देता येणार आहे.

Jonty Rhodes
ODI World Cup : २ वेळा वर्ल्ड चॅम्पियन, पण सलग तिसऱ्यांदा थेट पात्र नाही; अपयशी ठरतोय एकेकाळचा दिग्गज संघ

Fireflies.ai सोबत भागीदारी

रॉटरडॅम डॉकर्सने Fireflies.ai सोबत अधिकृत जर्सी पार्टनर म्हणून भागीदारी केलीये. या भागीदारीसोबत Fireflies.ai चे सहसंस्थापक आणि सीईओ कृष्ण रामिनेनी हे रॉटरडॅम डॉकर्सचे Founding Investor म्हणूनही टीमशी जोडले गेले आहेत.

२६ ऑगस्टपासून ETPLला सुरुवात

आयसीसीच्या मान्यतेने होणाऱ्या ETPLच्या पहिल्या सिझनमध्ये आयर्लंड, नेदरलँड्स आणि स्कॉटलंडसह जगभरातील अनेक टी-२० स्टार खेळाडू सहभागी होणार आहेत. युवा युरोपीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेटपटूंसोबत खेळता यावं आणि त्यांच्याकडून शिकता यावं, हा या लीगचा मुख्य उद्देश आहे.

Jonty Rhodes
क्रिकेटर अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप

ETPLचा पहिला सिझन २६ ऑगस्ट ते २० सप्टेंबर २०२६ या काळात होणार आहे. व्हूरबर्ग आणि डब्लिनमध्ये सामने खेळवले जाणार आहे. सहा शहरांच्या टीम पहिल्या ETPL विजेतेपदासाठी मैदानात उतरणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com