Home Remedies : हिवाळ्यात घसा खवखवतोय, खोकला काही केल्या जात नाही? आजच करा हे ७ सोपे बदल

Namdeo Kumbhar

हिवाळ्याचा खोकल्याचा त्रास

हिवाळा सुरू झाला की अनेकांना खोकल्याचा त्रास सुरू होतो. औषधांसोबतच दैनंदिन जीवनातील हे ७ सोपे बदल तुम्हाला देऊ शकतात लवकर आराम.

Winter Cough, Sore Throat | pinterest

हिवाळ्यात खोकला का वाढतो?

थंडीची हवा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यामुळे हिवाळ्यात घसा खवखवणे आणि खोकला दीर्घकाळ राहू शकतो.

Winter Cough, Sore Throat | pinterest

कोमट पाणी प्या

दिवसभर थंड पाण्याऐवजी कोमट पाणी प्या. यामुळे घशातील कोरडेपणा कमी होऊन कफ पातळ होण्यास मदत होते.

Winter Cough, Sore Throat | pinterest

वाफ घेण्याची सवय

दिवसातून एकदा किंवा झोपण्यापूर्वी साधी वाफ घ्या. श्वसनमार्ग मोकळा होण्यास आणि छातीतील जडपणा कमी होण्यास फायदा होतो.

Winter Cough, Sore Throat | pinterest

खोलीतील हवा ओलसर ठेवा

हिवाळ्यात हवा कोरडी असते. खोलीत ह्युमिडिफायर वापरा किंवा पाण्याचे भांडे ठेवा, जेणेकरून घशाला त्रास होणार नाही.

Winter Cough, Sore Throat | pinterest

धूळ आणि धुरापासून बचाव

घराबाहेर पडताना मास्क वापरा. धूळ, धूर आणि थंड वारा खोकला अधिक चिडवू शकतो.

Winter Cough, Sore Throat | pinterest

आहारात उष्ण पदार्थांचा समावेश

आले, तुळस, काळी मिरी आणि हळद यांचा चहा किंवा काढ्यात समावेश करा. हे घशाला आराम देतात.

Winter Cough, Sore Throat | pinterest

रात्रीचे जेवण हलके ठेवा

झोपण्यापूर्वी जड, तळलेले किंवा खूप थंड पदार्थ टाळा. रात्री खोकल्याची उबळ येण्याची शक्यता कमी होते.

Winter Cough, Sore Throat | pinterest

पुरेशी झोप आणि विश्रांती

शरीराला बरे होण्यासाठी विश्रांती गरजेची असते. रोज ७ ते ८ तासांची झोप घेतल्यास प्रतिकारशक्ती मजबूत राहते.

Winter Cough, Sore Throat | pinterest

त्रास वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला

हे बदल उपयोगी ठरतात, पण खोकला खूप दिवस राहिल्यास किंवा ताप आल्यास डॉक्टरांना नक्की दाखवा.

Winter Cough, Sore Throat | pinterest