Shreya Maskar
लग्नसमारंभात नववधूचा पारंपरिक लूक खुलवण्यासाठी पैठणी साडीला विशेष पसंती दिली जाते. पैठणीमधील सुंदर रंगसंगती, आकर्षक पदर आणि सोनेरी जरीची नक्षी नववधूच्या सौंदर्यात भर घालते.
मोराच्या सुंदर नक्षीकामामुळे या पैठणीला खास पारंपरिक लूक मिळतो. लग्नसोहळा किंवा रिसेप्शनसाठी ही साडी नववधूंची आकर्षक निवड ठरू शकते.
या साडीवर कमळाच्या फुलांची सुंदर नक्षी विणलेली असते. लाल, गुलाबी आणि जांभळ्या रंगांमध्ये कमळ पैठणी नववधूला देखणा लूक देते.
या पैठणीमध्ये साडीचा काठ आणि मुख्य भाग यांचे रंग वेगवेगळे असतात. कॉन्ट्रास्ट रंगसंगतीमुळे साडीला उठावदार आणि शाही लूक मिळतो.
पैठणीच्या पारंपरिक नक्षीकामाची प्रेरणा असलेल्या शालू साड्या लग्नसमारंभासाठी लोकप्रिय आहेत. बजेटमध्ये आकर्षक पारंपरिक लूक हवा असल्यास हा पर्याय विचारात घेता येतो.
या पैठणीच्या पदरावर नारळाच्या आकारासारखी पारंपरिक नक्षी पाहायला मिळते. साधेपणातही शाही आणि उठावदार लूक देणारी ही पैठणी लग्नासाठी छान दिसते.
एकाच रंगाच्या पार्श्वभूमीवर सुंदर सोनेरी किंवा रंगीत नक्षीकाम असलेली ही पैठणी आकर्षक दिसते. क्लासिक आणि एलिगंट लूक हवा असल्यास नववधू ही साडी निवडू शकतात.
या पैठणीच्या पदरावर बांगडीच्या आकारातील नक्षीमध्ये मोर विणलेले असतात. पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिन्यांसोबत ही साडी अतिशय सुंदर दिसते.