Head Tingling : डोक्याला अचानक मुंग्या येतात? 'या' गंभीर आजाराचे आहे संकेत, दुर्लक्ष करणे पडेल महागात

Shreya Maskar

डोक्याला मुंग्या येणे

डोक्याला अचानक मुंग्या येणे, टाळूवर झिणझिण्या जाणवणे किंवा डोक्याचा एखादा भाग सुन्न झाल्यासारखा वाटणे ही समस्या अनेकांना जाणवते.

Tingling in the head | pinterest

मानसिक तणाव

अतिरिक्त तणाव किंवा चिंतेमुळे शरीरात काही बदल होतात. वेगाने श्वास घेणे किंवा स्नायूंमध्ये ताण निर्माण झाल्यामुळे डोक्याला झिणझिण्या जाणवू शकतात.

mental stress | pinterest

मानेच्या नसांवर दाब येणे

चुकीच्या पद्धतीने बसणे, सतत मोबाईल वापरणे किंवा मानेचे स्नायू आखडल्यामुळे नसांवर दाब येऊ शकतो. यामुळे डोक्याच्या मागील भागात मुंग्या किंवा झिणझिण्या जाणवू शकतात.

Pressure on the neck nerves | pinterest

व्हिटॅमिन B12 ची कमतरता

शरीरात व्हिटॅमिन B12 कमी झाल्यास नसांच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शरीराच्या विविध भागांमध्ये मुंग्या येणे, सुन्नपणा किंवा झिणझिण्या जाणवू शकतात.

Vitamin B12 deficiency | pinterest

मायग्रेनचा त्रास

मायग्रेनमध्ये तीव्र डोकेदुखीसोबत काही लोकांना झिणझिण्या किंवा संवेदना बदलण्याचा त्रास होतो. काही वेळा डोकेदुखी सुरू होण्यापूर्वीही अशी लक्षणे दिसू शकतात.

Migraine pain | pinterest

टाळूच्या त्वचेची समस्या

टाळूवर खाज, जळजळ, अ‍ॅलर्जी किंवा त्वचेची जळजळ निर्माण करणाऱ्या उत्पादनांमुळे अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे डोक्याच्या त्वचेवर टोचल्यासारखे किंवा मुंग्या आल्यासारखे वाटू शकते.

Scalp skin problem | pinterest

मधुमेहामुळे नसांवर होणारा परिणाम

मधुमेहामुळे नसांचे नुकसान होण्याची शक्यता असते. याला डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतात. यामुळे प्रामुख्याने हात-पायांमध्ये मुंग्या येतात; काही वेळा शरीराच्या इतर भागांतील संवेदनांवरही परिणाम होऊ शकतो.

diabetes | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest