Pune News Saam tv
मुंबई/पुणे

Pune News : बिल भरा नाहीतर बत्ती गुल! ऐन उन्हाळ्यात पुण्यातील २९००० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

Pune latest News : वीज बिल थकवणाऱ्या ग्राहकांवर महावितरणने मोठी कारवाई केली आहे. पुण्यात २९००० वीज ग्राहकांवर कारवाई करण्यात आली आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे : वीज बिल न भरलेल्या पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे विभाग गेल्या २५ दिवसात तब्बल २९ हजार जणांचा वीजपुरवठा वीज बिल न भरल्यामुळे खंडित करण्यात आला आहे. पुणे विभागाच्या महावितरण विभागाने थकबाकी वसूल करण्यासाठी आता वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे. घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीजग्राहकांकडे ८८ कोटी ४५ लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी आहे. महावितरणची आर्थिक मदार ग्राहकांकडील वीजबिलांच्या दरमहा वसुलीवर असल्यामुळे आता विभागाने थकबाकी वसूल करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र केली आहे.

परिमंडलातील विविध ठिकाणी दौरे करून शाखा कार्यालयांपर्यंत थकबाकी वसुलीचा आढावा घेण्यात येतोय. कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी लवकरात लवकर त्यांचे लाईट बिल असे आवाहन महावितरण विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महावितरण विभागाने वीज बिल न भरलेल्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये पुणे विभागातील शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांचा सुद्धा समावेश आहे.

पुणे परिमंडलातील २९ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा गेल्या २५ दिवसांत खंडित करण्यात आला आहे. महावितरण विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार याबाबत बोलताना म्हणाले, 'संपूर्ण पुणे विभागात महावितरण विभागाची कारवाई सुरू आहे. यामध्ये शहरासह पिंपरी चिंचवड यासह ग्रामीण भागात सुद्धा कारवाई सुरू आहे. जे नागरिक त्यांच्या घराचे किंवा आस्थापनाचे वीज बिल भरत नाहीत त्यांचा वीज पुरवठा आमच्या कर्मचाऱ्यांकडून खंडित करण्यात येतोय'.

'वीजग्राहकांना बिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी विभागाची वेबसाइट व मोबाइल ॲपद्वारे ऑनलाइन सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरित भरणा करावा', असे आवाहन पवार यांनी केलं आहे. पुणे शहरातील वीजग्राहकांकडे ४० कोटी ९ लाख रुपयांची थकबाकी आहे. गेल्या २४ दिवसांमध्ये १० हजार १७७ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

दुसऱ्या बाजूला, पिंपरी-चिंचवड शहरात घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे १८ कोटी ४० लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यातील ७ हजार ७९६ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. महावितरण विभागाकडून ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, राजगड, हवेली याभागात सुद्धा कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

SCROLL FOR NEXT