
अक्षय बडवे, साम टीव्ही
पिंपरी चिंचवडमधून बेपत्ता झालेल्या तरूणीचा मृतदेह लोहगडाच्या पायथ्याशी आढळून आला आहे. शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी गुरुवारी तिचा मृतदेह घेरेवाडी परिसरातील झाडाझुडपातून बाहेर काढला. काही दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात तरूणी बेपत्ता झाली असल्याची तक्रार पालकांनी दाखल केली होती.
पोलिसांनी तरूणीचा शोधमोहीम सुरू केली. मात्र, तरूणीचा थेट मृतदेह गडाच्या पायथ्याशी आढळला. तरूणीचा मृत्यू झाला कसा? तिचा मृतदेह गडाच्या पायथ्याशी आलाच कसा? याचा शोध पोलीस घेत आहेत.
पिंपरी चिंचवडच्या सांगवीमधून एक २१ वर्षीय तरूणी बेपत्ता झाली होती. मानसी प्रशांत गोविंदपुरकर असे मृत तरूणीचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, मानसी मंगळवारी सकाळी कॉलेजकडे जाण्यासाठी घरातून निघाली होती. त्यानंतर ती एका टॅक्सीतून लोहगड येथे एकटीच पोहोचली. तिकीट काउंटरवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती किल्ल्यावर जाताना दिसली.
मात्र, त्यानंतर ती घरी पोहोचलीच नाही. पालकांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तिचा शोध सुरू केला. लोहगड परिसरात पोलिसांनी शोधकार्य सुरू केला. या शोधकार्यात शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि नातेवाईकांनीही पोलिसांना सहकार्य केले.
शिवदुर्ग रेस्क्यू टीमला तरूणीचा मृतदेह, लोहगडाच्या पायथ्याशी नवग्रह मंदिराजवळील झाडाझुडपात आढळला. गडावरून पडल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचाही प्रयत्न सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.