Maharashtra ZP Elections x
मुंबई/पुणे

Zilla Parishad election : या झेडपीच्या निवडणुका कोणत्याही क्षणी, अजित पवारांचं मोठं वक्तव्य, वाचा नेमकं काय म्हणाले

Maharashtra Zilla Parishad Panchayat Samities election Date schedule 2026 : महापालिका निवडणुकांनंतर राज्यातील जिल्हा परिषद निवडणुका कुठल्याही क्षणी जाहीर होऊ शकतात, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

Namdeo Kumbhar

Maharashtra Zilla Parishad election schedule 2026 : महापालिका निवडणुका सुरू असतानाच राज्यातील प्रलंबित जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांबाबत मोठं विधान केलं. महापालिकांनंतर कुठल्याही क्षणी जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होतील. 50 टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या झेडपी निवडणुका आधी होतील असं अजित पवारांनी म्हटलं आहे. ते कोरेगाव भीमा येथे बोलत होते.

नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकासारखेच राज्यात दोन टप्प्यात जिल्हा परिषद निवडणुका होण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या पेचामुळे झेडपीच्या आधी महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. अखेरच्या तिसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा (ZP Elections 2025) धुरळा उडणार आहे. पण त्याही दोन टप्प्यात होऊ शकतात. ५० टक्के आरक्षणाच्या आत असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आधी होतील. त्यानंतर उर्वरित झेडपीच्या निवडणुका होतील, असा अंदाज वर्तवला जातोय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत सूचक वक्तव्य केलेय. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन टप्प्या होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जातेय.

संभाव्य तारीख आली समोर -

अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या ३२ जिल्हा परिषद आणि ३३१ पंचायत समितिच्या निवडणुका महिनाअखेरला (Expected date for ZP and Panchayat Samiti elections 2025) जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, नांदेड, बीड, अहमदनगर आणि अमरावती यांसारख्या अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहेत, ज्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. (Maharashtra local body elections 32 ZP ELection schedule) ८ जानेवारीच्या आतमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच शक्यता आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

जिल्हा परिषदेची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता आहे. आचारसंहितेमुळे कुठली अडचण निर्माण होईल ती होता कामा नये. निवडणुका जाहीर करण्याचा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. निवडणूक आयोग त्याबाबतचा निर्णय घेईल. विदर्भातील जिल्हा परिषद उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद कोकणातील जिल्हा परिषद पन्नास टक्के पेक्षा जास्त आरक्षण असणाऱ्या जिल्हा परिषद आहेत. ते आरक्षण 50 टक्के पर्यंतच घ्या, अशा सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. 50% च्या आत असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आधी होतील, असे अजित पवार म्हणाले.

कोणत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार?

सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आधी होतील, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितलेय. ६ ते ८ जानेवारीच्या दरम्यान आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. २० जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका ३१ जानेवारीनंतरच होतील, असे समोर आलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care : केसांना मुलतानी माती लावण्याचे चमत्कारिक फायदे , जाणून घ्या

Maharashtra Live News Update : मनोज जरांगे पाटील आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर

करोडपती यूट्यूबरसोबत संसार थाटणार रितेश देशमुखची अभिनेत्री ? साखरपुड्यावर स्पष्टच बोलली, वाचा नेमकं प्रकरण

Deepika Padukone Video : बायको असावी तर अशी! 'धुरंधर'च्या यशाचा जल्लोष; दीपिकाने रणवीरसाठी बनवला 'हा' खास मराठमोळा पदार्थ

Dalimb Juice Recipe: थंडीत डाळिंबाचा टेस्टी आणि फ्रेश ज्यूस नक्की प्या, वाचा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT