

BJP municipal election nepotism controversy : घराणेशाही नको नको म्हणणाऱ्यांनीच महापालिका निवडणुकीत सर्वाधिक नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिलीय... त्यामुळे निष्ठावंतांनी बंडाचं निशाण फडकवलंय. भाजपच्या यादीतही घराणेशाहीचा डंका दिसतोय. बंडोबांना रोखण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून 'ऑपरेशन मनधरणी' सुरू करण्यात आले आहे. राज्यातील एकूण परिस्थितीवरचा हा स्पेशल रिपोर्ट...
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारी न मिळाल्यानं अभूतपूर्व गोंधळ दिसून आलाय. अनेक ठिकाणी निष्ठावंतांची रडारड, बंडोबांचा संताप तर कार्यकर्त्यांचा उद्रेक दिसून आला... आणि त्यामागचं कारण आहे उपऱ्यांसोबतच नेत्यांनी घराणेशाहीला दिलेलं प्राधान्य.... मात्र मुंबई महानगर क्षेत्रात कोणत्या महापालिकेत किती कोणत्या पक्षाच्या किती नेत्यांनी घराणेशाहीला प्राधान्य दिलंय... पाहूयात...
MMR मध्ये नाती उदंड झाली
भाजप- 55
शिंदेसेना- 53
ठाकरेसेना- 16
सपा-01
राष्ट्रवादी (AP) 04
राष्ट्रवादी (SP)
काँग्रेस - 06
मनसे- 09
खरंतर याच घराणेशाहीमुळे मुंबई महापालिकेत सर्वपक्षीयांची नाराजी उफाळून आलीय.. तर तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी दिल्यानं निष्ठावंतांनी स्वपक्षाच्या नेत्यांनाच घरचा आहेर दिलाय. दुसरीकडे प्रवीण दरेकरांचे भाऊ प्रकाश दरेकरांच्या उमेदवारीमुळे निष्ठावंतांनी ठिय्या मांडलाय... तर विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या घरात 3 जणांना उमेदवारी देण्यात आली.. राहुल नार्वेकरांचे भाऊ मकरंद नार्वेकर, वहिनी हर्षिता नार्वेकर आणि बहीण गौरवी शिवलकर यांना उमेदवारी देण्यात आलीय..
खरंतर घराणेशाहीविरोधात रान पेटवणाऱ्या भाजपसह सर्वच पक्षांनी घराणेशाहीलाच प्राधान्य दिलंय.. त्यामुळे नेत्यांचे नातेवाईक घोड्यावर तर निष्ठावंत कार्यकर्ते वाऱ्यावर सोडण्यात आलेत... त्यामुळे नेत्यांकडून सुरु असलेल्या मनधरणीसमोर झुकत निष्ठावंत माघार घेणार की अस्तित्वाच्या लढाईत पक्षाविरोधात बंडाचा झेंडा कायम ठेवणार... यावर महापालिकेचा विजय ठरणार आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.