

Mumbai municipal election Marathi identity issue : मुंबई महापालिकेवर परप्रांतिय महापौर बसवण्याचा डाव आखला जातोय...हा डाव नेमकं कोण आखतयं? मतांच्या कृपेसाठी नेमकं कोण बरळलंय... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
मराठ्यांच्या महाराष्ट्रात उत्तर भारतीय महापौर बसवण्याचं हे दुस्वप्न पाहिलंय, भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी. मराठी मतदारांच्या कृपेनं ३ वेळा विधानसभा, एकदा विधानपरिषद आणि दोनदा राज्यमंत्री अशी प्रदीर्घ राजकीय कारकिर्द केवळ आणि केवळ मराठी माणसाच्या जीवावर उपभोगलेल्या या कृपाशंकर सिंह यांनी अकलेचे तारे तोडत मराठी मन आणि मराठी जनांना दुखावलंय. त्यामुळे कृपाशंकर सिंह यांच्या या बेताल वक्तव्यावर प्रतिक्रीया तर येणारंच..
मिरा भाईंदरमध्ये याआधीही मराठी माणसाला डिवचण्याचे प्रकार झाले होते. त्या त्या वेळी मराठी माणसानं परप्रांतियांची मग्रुरी ठेचून काढली होती मात्र आता पुन्हा मराठी माणसाला डिवचण्याचे हे धंदे सुरु झालेत कारण राज्यात महापालिकांच्या निवडणुका आल्या. परप्रांतिय व्होट बँकवर डोळा ठेवत त्यांना कुरवाळण्याची ही राजकीय खेळी आता लहान मुलांनाही कळणारी त्यामुळे अमराठी मतदार या प्रलोभनाला भूलण्याची शक्यता कमीच.
गणितं जुळवून अमराठी महापौर करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या या कृपाशंकर सिंह यांनी युपीत जाऊन लोकसभा निवडणुक लढवली आणि युपीच्या जनतेनं यांचा 1 लाख मतांनी दारुण पराभव करत त्यांना संसदेऐवजी पुन्हा महाराष्ट्रात पाठवलं. ज्यांनी यांना खासदार म्हणून नाकारलं त्यांनाच महापौर करण्यासाठी सेटींग करणाऱ्या कृपाशंकर सिंह यांना आता मराठी मतदारांनी मराठीच्या सन्मानासाठी मतपेटीतून उत्तर देण्याची वेळ आलीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.