Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Shocking : सिंहगडावर फिरायला आलेला तरुण बेपत्ता; २४ तास उलटूनही शोध लागला नाही

Pune News : सिंहगडावर फिरायला गेलेला तरुण गौतम गायकवाड बुधवारी संध्याकाळपासून बेपत्ता झाला आहे. २४ तास उलटूनही अद्यापही त्याचा शोध लागलेला नाही. पोलिसांच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून तपास सुरु आहे.

Alisha Khedekar

  • सिंहगडावरून पर्यटक गौतम गायकवाड बेपत्ता

  • २४ तास उलटूनही पोलिस व वनविभागाचा शोध सुरू

  • सीसीटीव्ही फुटेजमध्ये हुडी घालून चालणारी संशयास्पद व्यक्ती

  • सुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; नातेवाईकांची चिंता वाढली

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळ सिंहगडावरून बुधवारी संध्याकाळपासून एक तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली. २४ तास उलटूनही या तरुणाचा शोध लागलेला नाही. बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव गौतम गायकवाड असून तो मूळचा महाराष्ट्राचा असला तरी सध्या हैद्राबाद येथे वास्तव्यास आहे.

गौतम बुधवारी आपल्या चार मित्र आणि एका मैत्रिणीसोबत सिंहगडावर फिरण्यासाठी आला होता. सगळे मित्र मिळून गडावरील किल्ल्याचे पर्यटन करत होते, फोटो-व्हिडिओ काढत होते. या दरम्यान गौतमने आपला मोबाईल मित्राकडे ठेवून लघुशंकेसाठी बाहेर गेला, मात्र बराच वेळ झाला तरी तो परतला नाही. त्याच्या मित्रांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोधादरम्यान पर्यटन विकास महामंडळाच्या इमारतीजवळील कड्यालगत त्याची चप्पल आढळून आली. यामुळे संशय अधिकच गडद झाला.

या घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिसांनी गडावर पोहोचून शोधमोहीम सुरू केली. वनविभागाची मदत घेऊन परिसरातील झाडी, कडे आणि पायवाटा तपासल्या. दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांनाही शोधमोहीमेत सामील करण्यात आले. मात्र अद्याप ठोस धागा पोलिसांच्या हाती आलेला नाही.

दरम्यान, गुरुवारी हवेली पोलिसांनी तपास वाढवत कोंढणपूर टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यात संशयास्पद बाब समोर आली आहे. बेपत्ता झाल्यानंतर सुमारे दोन तासांनी एका मोटारीच्या पाठीमागून हुडी घालून चालत जाणारी व्यक्ती दिसत आहे. या व्यक्तीने आपले तोंड झाकलेले असून त्याची हालचाल संशयास्पद वाटते. पोलिसांनी हा फुटेज गौतमच्या नातेवाईकांना तसेच त्याच्या मित्रांना दाखवला. मात्र ती व्यक्ती गौतमच आहे की नाही, याबाबत स्पष्ट निष्कर्ष काढता आलेला नाही.

पोलिसांचा तपास सध्या दोन दिशेने सुरू आहे. एकीकडे तो अपघाती पद्धतीने कड्यावरून घसरला किंवा एखाद्या धोकादायक भागात गेला का, हे तपासले जात आहे. दुसरीकडे, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा हुडी घातलेला संशयास्पद तरुण खरोखरच गौतम आहे का, याचा शोध घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर नातेवाईकांची चिंता वाढली असून त्यांनी अधिकृतरीत्या सखोल तपासाची मागणी केली आहे.

सिंहगड हे पुण्याजवळील प्रमुख पर्यटन स्थळ असल्याने रोज मोठ्या संख्येने पर्यटक येथे दाखल होतात. मात्र, अनेकदा बेपत्ता होणे, अपघात किंवा अनुशासनभंगाच्या घटना घडत असल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा सिंहगडावरील पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी व व्यवस्थापनावर चर्चा सुरू झाली आहे.

हवेली पोलिसांच्या मदतीने स्थानिक बचाव पथके व वनविभागाचा स्टाफ या शोधात गुंतलेला आहे. गौतम गायकवाडचा शोध लागेपर्यंत प्रयत्न सुरु राहतील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मात्र तो सुरक्षित परत येईल की नाही, याबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे.

गौतम गायकवाड कधी बेपत्ता झाला?

तो बुधवारी संध्याकाळी सिंहगडावर मित्रांसोबत असताना बेपत्ता झाला

शोधमोहीमेत कोण सहभागी आहेत?

हवेली पोलिस, वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थ मिळून शोध घेत आहेत.

काही धागेदोरे मिळाले आहेत का?

कड्यालगत त्याची चप्पल सापडली असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये हुडी घालून चालणारी संशयास्पद व्यक्ती दिसली आहे.

सुरक्षेबाबत काय प्रश्न निर्माण झाले आहेत?

वारंवार बेपत्ता होणे आणि अपघाताच्या घटना घडल्याने सिंहगडावरील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT