Pune Crime News: पुण्यात दहशत; हातात धारदार कोयते, गलिच्छ शिव्या देत टोळक्यांचा धुडगूस|VIDEO

Midnight Terror in Pune: पुण्यातील येरवडा गणेश नगर परिसरात मध्यरात्री टोळक्यांनी हातात धारदार कोयते घेऊन दहशत माजवली. गलिच्छ शिव्या, शस्त्रांचे खुले प्रदर्शन आणि नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.

पुणे येथील येरवडा गणेश नगर भागातील औद्योगिक शाळा , परिसरात, लॉकअप ग्रुप, दुर्गा माता मंदिर , या भागामध्ये टोळक्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास अक्षरशः दहशत माजवली. हातात धारदार कोयते, चेहऱ्यावर रुमाल, डोळ्यांत विक्राळ रोष आणि तोंडातून गलिच्छ शिव्यांचा पाऊस — या मोकाट गुन्हेगारांनी गल्लोगल्ली फिरत नागरिकांना उघडपणे शिव्या देत हवा चिरणारे कोयत्यांचे फटकारे मारले. पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला, तर परिसरात भीतीची दाट सावली पसरली. काही दिवसांपूर्वीच लक्ष्मी नगर भागात दोन गटांमध्ये रक्तरंजित गँगवार झाल्याने वातावरण आधीच तापले होते, त्यात या प्रकाराने नागरिकांच्या संतापाला तोंड फुटले आहे. माहितीप्रमाणे, दोन गटांमध्ये सुरू झालेलं भांडण चिघळून थेट शस्त्रांच्या खुले प्रदर्शनात बदललं. स्थानिक नागरिकांचा इशारा स्पष्ट आहे. रस्त्यावर कोयत्यांचं खुले प्रदर्शन हा थेट दहशतवाद आहे, आणि यावर तात्काळ कठोर कारवाई झाली नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाऊन भीषण परिणाम होऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com