Sinhagad: पर्यटकांसाठी आज सिंहगड किल्ला राहणार बंद

Dhanshri Shintre

सिंहगड किल्ला

आज, २९ मे २०२५ रोजी सिंहगड किल्ला बंद राहील.

मुसळधार पाऊस

मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या धोक्यामुळे, कल्याण दरवाजा आणि अतरवाडीसह सर्व ट्रेकिंग मार्गांवरून प्रवेश बंद राहील.

वन विभागाचा आदेश

आज एक दिवस सिंहगड बंद राहणार असल्याचा वन विभागाचा आदेश आहे.

शासकीय पाहणी

आपत्ती निवारणाच्या शासकीय पाहणी दौऱ्याच्या अनुषंगाने किल्ला बंद ठेवण्यात आला आहे.

सतर्कतेचा इशारा

अतिवृष्टी पुढील काही दिवस राहणार असल्याबाबत हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.

पर्यटकांनाही बंदी

यामध्ये ट्रेकिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांनाही बंदी घालण्यात आली असून कल्याण दरवाजा, आतकरवाडी तसेच इतर सर्व पायी मार्गांनी प्रवेश करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

सुरक्षित राहण्याची विनंती

सार्वजनिक सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे आणि अधिकाऱ्यांनी सर्व अभ्यागतांना या काळात सहकार्य करण्याची आणि सुरक्षित राहण्याची विनंती केली आहे.

NEXT: पावसात ट्रेकिंगसाठी शोधताय खास ठिकाणं? मग 'या' ६ गडकिल्ल्यांना नक्की भेट द्या

येथे क्लिक करा