Dhanshri Shintre
सध्या मान्सूनने महाराष्ट्रभर हजेरी लावली असून अनेक भागात पावसाचा जोरदार अनुभव येतोय.
पावसाची चाहूल लागताच आठवण येते ती वाफाळत्या चहा आणि गरमागरम कुरकुरीत भजीची.
पावसाळा आला की निसर्गसौंदर्यासोबत आठवण येते ती रोमांचकारी ट्रेकिंगची, जे मनाला खास आनंद देतं.
पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी ठिकाण शोधताय? मग महाराष्ट्रातील हे निवडक गड-किल्ले अवश्य पाहा आणि साहसी आनंद घ्या.
पावसाळ्यात हरिहर किल्ल्यावर ट्रेक करणं खास अनुभव ठरतं; उंचावरून दिसणारं दृश्य मनाला मंत्रमुग्ध करतं.
अधिक साहस आणि चढाईचा अनुभव घ्यायचा असेल तर कळसुबाई शिखर पावसाळ्यात ट्रेकर्ससाठी सर्वोत्तम ठिकाण ठरतं.
सह्याद्रीतील हरिश्चंद्रगड हा ट्रेकर्ससाठी पर्वणीच आहे; ट्रेकप्रेमींनी आयुष्यात एकदा तरी येथे जायलाच हवं.
अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील रतनगड, कळसूबाई, हरिश्चंद्रगड या गडांवर पावसाळ्यात ट्रेकर्स मोठ्या संख्येने भेट देतात.
लोणावळ्यातील लोहगड किल्ला पावसाळ्यात ट्रेकर्सचा खास पसंतीचा ठिकाण ठरतो, मुंबई-पुण्यातील पर्यटक येथे आवर्जून येतात.
पावसाळ्यात पनवेलजवळील कलावंतीण दुर्गाकडे ट्रेकर्स गर्दी करतात; धबधबा आणि खोल वाटीचा नयनरम्य नजारा खास आकर्षण आहे.