Dhanshri Shintre
मुंबई आणि परिसरात मान्सून आल्यानं निसर्ग खुललाय, त्यामुळे हीच योग्य वेळ आहे त्याचा आस्वाद घेण्याची.
मुंबईजवळचे धबधबे वीकेंडला निसर्गसौंदर्याचा आनंद घ्यायला एकदम परफेक्ट आणि ताजेतवाने करणारा पर्याय ठरतो.
मुंबईपासून दूर न जाता निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल, तर कर्जतजवळील भिवपुरी धबधबा एक उत्तम एकदिवसीय सहलीचा पर्याय आहे.
पावसाळ्यात नवी मुंबईजवळील पांडवकडा धबधबा हा एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्यटकस्थळ आहे, जे शहरापासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर आहे.
देवकुंड धबधब्याची शांतता आणि निसर्गरम्य वातावरण मनाला भुरळ घालतात, जे एकदिवसीय सहलीसाठी आदर्श ठिकाण ठरतं पावसाळ्यात खास अनुभवासाठी.
वांगणीजवळील भगीरथ धबधबा अजूनही कमी प्रसिद्ध आहे, त्यामुळे इतरांपेक्षा शांत. कुटुंब आणि मित्रांसोबत निवांत वेळ घालवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.
मुंबईपासून पाच तासांवर असलेला हा धबधबा महाबळेश्वरमधील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक असून, एकदिवसीय सहलीसाठी उत्तम पर्याय ठरतो.
ठोसेघर धबधबा, मुंबईजवळील प्रसिद्ध मोसमी धबधबा, सुमारे 500 मीटर उंच असून निसर्गाच्या सान्निध्यात पिकनिकसाठी आदर्श आणि शांत ठिकाण आहे.