Pune Crime: पैशांची मागणी, वारंवार शिवीगाळ; तरुणीचं डोकं फिरलं, रॉडने मारहाण करत तरुणाला संपवलं

Pimpri-Chinchwad Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये एका महिला जिम ट्रेनर आणि मित्राने एका तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण केली. यात तरुणाचा मृत्यू झाला असून याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केलीय.
Pune Crime
Pimpri-Chinchwad CrimeSaamtv
Published On
Summary
  • पिंपरी-चिंचवडमध्ये प्रोटीन पझल शॉपमध्ये तरुणाचा खून.

  • आरोपी लेडी जिम ट्रेनर प्रांजल तावरे आणि मित्र यश पाटोळे अटकेत.

  • लोखंडी रॉड व लोखंडी पारने मारहाण करून हत्या.

  • दिघी पोलिसांनी दोन्ही आरोपींवर खूनाचा गुन्हा दाखल केला.

गोपाल मोटघरे, साम प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारी वाढलीय. आता पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणीने मित्राच्या मदतीने एकाची हत्या केल्यानं खळबळ उडालीय. दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हत्येचा घटना घडलीय. येथील प्रोटीन पझल शॉपमध्ये तरुणाला एका लेडी जिन ट्रेनरनं लोखंडी मारहाण केली असून यात तरुणाचा मृ्त्य झालाय.

Pune Crime
Beed Crime : बीडमध्ये गुंडाराज सुरूच! ५० हजारांसाठी कंत्राटदाराला मारहाण; व्हिडीओ फोटोंसह पुरावे दिले

प्राथमिक माहितीनुसार, खून झालेल्या तरुणाचे नाव गोपीनाथ वर्पे आहे. यश पाटोळे आणि प्रांजल तावरे यांच्या मालकीच्या प्रोटीन पझल शॉप या दुकानांमध्ये गेला होता. तेथे त्याने प्रांजल तावरेला शिवीगाळ करून तिला त्रास दिला. त्यानंतर यश पाटोळे आणि प्रांजल तावरे या दोघांनी गोपीनाथ वर्पेला लोखंडी पार व लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केलं. जखमी गोपीनाथ वर्पे याला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. आरोपी यश पाटोळे आणि प्रांजल तावरे यांना दिघी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

Pune Crime
Beed News: धक्कादायक! मृत पावलेल्या महिलेच्या गळ्यातील एक तोळे सोनं चोरीला, जिल्हा रुग्णालयामधील प्रकार

यश पाटोळे आणि प्रांजल तावरे या दोघांचं पार्टनरशिपमध्ये प्रोटीन पझल शॉप आहे. या शॉपमध्ये आज दुपारी गोपीनाथ उर्फ लल्ला वर्पे हा आला होता. त्यावेळी त्याने प्रांजलला शिवीगाळ केली. वारंवार होणारी शिवीगाळ आणि पैशांची मागणी या त्रासाला प्रांजल कंटाळली होती. त्यातूनच ही हत्याकांडाची घटना घडली. आज दुपारी अडीचच्या सुमारास गोपीनाथ वर्पेनं प्रांजलला त्रास दिला. त्यावेळी प्रांजलने गोपीनाथच्या कानशिलात लगावली. त्यानंतर तिने आणि यशने मिळून लोखंडी रॉड आणि पहारने मारहाण केली.

यात गोपीनाथ गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेतील गोपीनाथला रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांकडून त्याला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर प्रांजल आणि यश दिघी स्वत: पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजर झाले अन् घडला प्रकार पोलिसांना सांगितला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com