Vasant More Latest News: Saamtv
मुंबई/पुणे

Vasant More Joined Shivsena: ब्रेकिंग! वसंत मोरेंनी शिवबंधन बांधलं, ठाकरेंनी दिली मोठी जबाबदारी; VIDEO

Vasant More Meet Uddhav Thackeray Sanjay Raut : पुण्यातील डॅशिंग नगरसेवक वसंत तात्या मोरे यांनी वंचित बहूजन आघाडीला सोडचिठ्ठी देत अखेर ठाकरेंच्या शिवसेनेत थाटात प्रवेश केला आहे.

Gangappa Pujari

मुंबई, ता. ९ जुलै २०२४

पुण्यातील डॅशिंग नगरसेवक वसंत तात्या मोरे यांनी वंचित बहूजन आघाडीला सोडचिठ्ठी देत अखेर ठाकरेंच्या शिवसेनेत थाटात प्रवेश केला आहे. आज लाखो समर्थकांसह मातोश्रीवर येत वसंत मोरे यांनी शिवबंधन बांधले. या पक्षप्रवेशासह ठाकरेंनी पुण्यातील गड मजबूत केला आहे. यावेळी वसंत मोरे यांना ठाकरेंनी महत्वाची जबाबदारीही सोपवली.

वसंत मोरेंचा ठाकरे गटात प्रवेश

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोकसभेआधी वंचित बहूजन आघाडीमध्ये प्रवेश केलेले डॅशिंग नगरसेवक वसंत मोरे यांनी विधानसभेआधी मोठा निर्णय घेतला आहे. आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी बोलताना वसंत मोरेंनी पुण्यामध्ये शिवसेना मजबूत करण्याचा शब्दही दिला. बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. १९९२ मध्ये शिवसेनेत सामील झालो. वयाच्या ३१ व्या वर्षांपर्यंत विभाग प्रमुख झालो. असे सांगत भविष्यात पुणे शहरात किमान २५ नगरसेवक निवडून आणणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरे यांचे कौतुक केले. तसेच पुण्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचा गड मजबूत करण्याचे आदेश देत महत्वाची जबाबदारीही दिली. पूर्वी पेक्षा जास्त शिवसेना पुण्यात वाढली पाहिजे ही शिक्षा नाही तर जबाबदारी आहे असं समजून काम करा. महाराष्ट्राची, ह संविधान रक्षणाची जबाबदारी लोकसभेची होती.आता सत्ता बदल करायचं आहे. आता मी पुण्याला शिवासैनिकांच्या मेळाव्याला येणार आहे. शिवसेनेत सामावून घेताना आनंद होत आहे. असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll : शशिकांत शिंदे पराभावाचा वचपा काढणार की महेश शिंदे पुन्हा आमदार होणार? एक्झिट पोलमधून कोरेगावचं चित्र स्पष्ट

CNG Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! सीएनजीच्या दरात २ रुपयांनी वाढ; तुमच्या शहरातील दर काय? जाणून घ्या

Nutrition Tips: जाणून घ्या,नवजात बाळाच्या विकासासाठी योग्य आहार

Exit Poll Maharashtra : कागलमध्ये समरजित घाटगे मारणार बाजी? पाहा Exit Poll

Leopard Attack : बिबट्याचा महिलेवर प्राणघातक हल्ला; मुलांसह शेतात कापूस वेचणी करतानाची घटना

SCROLL FOR NEXT