Maharashtra Politics : आताची सर्वात मोठी बातमी, आमदार बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार? पडद्यामागे काय घडतंय?

MLA Bachu Kadu Mahayuti Political Update: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येतेय. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार बच्चू कडू लवकरच महायुतीतून बाहेर पडणार, अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे.
MLA Bachu Kadu Mahayuti News
MLA Bachu Kadu Mahayuti NewsSaam TV

अमर घटारे, साम टीव्ही अमरावती

राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येतेय. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार बच्चू कडू लवकरच महायुतीतून बाहेर पडणार, अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू तिसरी आघाडी काढणार असल्याची माहिती आहे.

MLA Bachu Kadu Mahayuti News
Vidhan Parishad Election 2024 : विधानपरिषद निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांचा मास्टर प्लॅन; महाविकास आघाडीची पुन्हा मतं फुटणार?

बच्चू कडू (Mla Bacchu Kadu) यांची प्रहार संघटना, संभाजीराजे यांचा स्वराज्य पक्ष, रविकांत तुपकर यांची संघटना आणि आम आदमी पार्टी एकत्र विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. लवकर बच्चू कडू आणि संभाजीराजे छत्रपती एकत्र पत्रकार परिषद घेऊन याबाबतची अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती आहे.

आमदार बच्चू कडू हे महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aaghadi) राज्यमंत्री होते. मात्र, शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर त्यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. महायुतीकडून बच्चू कडू यांना कोणतेही मंत्रीपद मिळाले नाही. त्यांना फक्त दिव्यांग मंत्रालयावरच समाधान मानावे लागले.

मागील काही महिन्यांपासून महायुतीतील नेते आणि बच्चू कडू यांच्यात वादाचे फटाके फुटत असल्याचं समोर आलं आहे. लोकसभा निवडणुकीतही आमदार बच्चू कडू यांनी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात अमरावतीतून प्रहारचा उमेदवार उभा केला होता. त्यामुळे बच्चू कडू आणि महायुतीत सर्वकाही अलबेल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीआधी राज्यात नवी राजकीय समीकरणे जुळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माजी खासदार शाहू महाराज छत्रपती आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी भेट घेऊन नव्या युतीबाबत चर्चा केल्याचं समजतंय. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची संघटना आणि आम आदमी पार्टी देखील नव्या युतीत सहभागी होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

MLA Bachu Kadu Mahayuti News
Maharashtra Politics : वसंत मोरे आज शेकडो कार्यकर्त्यांसह शिवबंधन बांधणार, पुण्यात उद्धव ठाकरेंची ताकद वाढणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com