गणेश कवडे, साम टीव्ही मुंबई
विधानपरिषद निवडणुका काही दिवसांवर येवून ठेपल्यात. त्याअगोदर महायुती उमेदवार निवडून आणण्यासाठी मतदान पॅटर्न निश्चित करत असल्याची माहिती मिळतेय. या निवडणुकीसाठी महायुतीने महत्वाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली आहे. २०२२ च्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत वापरलं होतं, तसंच पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरण्याच्या तयारीत महायुतीची असल्याचं दिसत आहे.
दोन दिवसांपुर्वी वर्षा बंगल्यावर महायुतीची महत्वाची बैठक पार पडली (Vidhan Parishad Election 2024) होती. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेतले असल्याचं देखील समोर येतंय. अपक्ष आमदारांसोबतच कॉंग्रेसचे ३ ते ४ तर ठाकरे गटाचे काही आमदार आपल्या गळाला लावण्याचे महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत.
राज्यात होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे वर्षा निवासस्थानी ६ जूलै रोजी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची यांची चर्चा झाली होती. निवडणुकीत महायुतीचे (Mahayuti) ९ उमेदवार रिंगणात आहेत. त्यांनी निवडून आणण्यासाठी मतांची गोळाबेरीज करण्यात आल्याची माहिती बैठकीनंतर सुत्रांनी दिली होती.
विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने तिन उमेदवार दिल्याने चुरस अजूनच वाढली आहे. त्यामुळेच महायुती अलर्टमोडवर आल्याचं दिसतंय. होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं (Legislative Council Election Politics) आहे. १२ जूलै रोजी होणाऱ्या या निवडणुकीत कोण बाजी मारतंय? याकडे साऱ्यांच्याच नजरा खिळल्या आहेत. महायुती कॉंग्रेस आणि ठाकरे गटाचे आमदार फोडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.