Vidhan Parishad Election 2024: विधानपरिषद निवडणुकीत कुणाचा होणार गेम? महायुतीची मध्यरात्रीपर्यंत खलबतं, मतांसाठी गोळाबेरीज सुरू VIDEO

Eknath Shinde Ajit Pawar Devendra Fadnvis Meeting On Varsha: राज्यात होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे काल रात्री विधानपरिषद निडणुकीसंदर्भात वर्षावर खलबतं झाल्याचं समोर आलंय.
विधानपरिषद निडणुकीसंदर्भात वर्षावर खलबतं
Vidhan Parishad Election 2024 Saam Tv
Published On

सुरज मसुरकर, साम टीव्ही मुंबई

लोकसभेनंतर राज्यात विधान परिषदनिवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. या निवडणुकीसाठी ११ जागा १२ उमेदवार रिंगणात असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता कोण जिंकणार अन् कोण माघार घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. यासाठीच वर्षावर महायुतीची मध्यरात्रीपर्यंत खलबतं सुरू असल्याचं समोर आलंय.

विधानपरिषद निडणुकीसंदर्भात वर्षावर खलबतं

वर्षा निवासस्थानी काल ६ जूलै रोजी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली. महायुतीचे ९ उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची गोळाबेरीज करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. महाविकास आघाडीने तिने उमेदवार दिल्यामुळे विधानपरिषद निवडणुकीची रंगत आणखीनच वाढली (Vidhan Parishad Election 2024) आहे.

विधानपरिषद निवडणुकीत कुणाचा गेम होणार?

आता विधानपरिषद निवडणुकीत कुणाचा गेम होणार? याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं (Maharashtra Legislative Council Election) आहे. काल रात्री मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. ही बैठक तास-दीड तास झाली. या बैठकीमध्ये महायुतीच्या उमेदवारांना निवडणून आणण्यासाठी मतांची गोळाबेरीज करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीने तीने उमेदवार दिल्याने चुरस आणखीनच (Maharashtra Politics) वाढली, त्यामुळेच ही बैठक झाल्याची माहिती मिळत आहे.

विधानपरिषद निडणुकीसंदर्भात वर्षावर खलबतं
Maharashtra Vidhan Parishad Election: विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार? आमदार फुटण्याची महायुतीला भीती, पडद्यामागे काय घडतंय?

कोणत्या पक्षाचे कोण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात?

महायुतीचे सर्वच उमेदवार निवडणून येतील, असा विश्वास कालच्या बैठकीनंतर महायुतीने व्यक्त केलाय. ही निवडणूक १२ जूलै रोजी होणार आहे. कोणत्या पक्षाचे कोण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, ते पाहूया.

भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर हे उमेदवार रिंगणात (Meeting On Varsha) आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे कृपाल तुमाने, भावना गवळी असे महायुतीचे एकूण नऊ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर तर शेकापला शरद पवार गटाचं समर्थन असल्याची माहिती मिळतेय. जयंत पाटील आणि कॉंग्रेसकडून प्रज्ञा सातव या रिंगणात आहेत.

विधानपरिषद निडणुकीसंदर्भात वर्षावर खलबतं
Vidhan Parishad Election : मुंबईसह राज्यातील ४ विधानपरिषदेसाठी आज मतदान; महाविकास आघाडी की महायुती, कुणाचं पारडं जड?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com